नागपूरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये नोकरीची संधी!
IIT Nagpur Recruitment 2024 : नागपूर शहरातील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये सध्या ‘ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)’ या रिक्त पदावर भरती होणार आहे. या पदासाठी नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज कसा आणि कुठे करावा याबद्दल जाणून घ्या. तसेच अर्जाची अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता आणि वेतन यांबद्दल अधिक महिती पाहा.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूरमध्ये ज्युनियर रिसर्च फेलो पदाची एक जागा रिकामी आहे.
शैक्षणिक पात्रता :
ज्युनियर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पुढील शिक्षण असणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी [ईसीई] / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी आणि इतर संबंधित क्षेत्रात किमान प्रथम श्रेणी [६०%] पदवी असणे आवश्यक.
अथवा
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (ईसीई) / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / मायक्रोइलेक्ट्रॉनिक विषयासह इतर संबंधित क्षेत्रांमध्ये एम.टेक.ची प्रथम श्रेणी [६०%] पदवी असणे आवश्यक.
अथवा
इलेक्ट्रॉनिक्स / भौतिकशास्त्र आणि संबंधित क्षेत्रात एम.एस्सी.ची प्रथम श्रेणी [६०%] पदवी असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी मोठी भरती! पदासंबंधीची माहिती पाहा
वेतन :
ज्युनियर रिसर्च फेलो या पदावर भरती झालेल्या उमेदवारास – पहिल्या दोन वर्षांसाठी ३१,०००/- रुपये वेतन देण्यात येईल. त्यानंतर पुढच्या वर्षासाठी ३५,०००/- रुपये वेतन दिले जाईल.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर अधिकृत वेबसाइट – https://iiitn.ac.in/
अर्ज प्रक्रिया
- ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या ई-मेल अॅड्रेसचा वापर करावा.
- अर्जासाठी ई-मेल अॅड्रेस – [email protected]
- इच्छुक उमेदवाराने अर्ज भरताना आपली संपूर्ण आणि योग्य माहिती भरावी.
- तसेच अर्जासह आवश्यक असल्यास आपली कागदपत्रे जोडावीत.
- उमेदवाराने नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे आवश्यक आहे. अर्ज उशिरा भरल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही १५ एप्रिल २०२४ अशी आहे.
ज्युनियर रिसर्च फेलो या नोकरीसंदर्भात उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, तसेच अधिसूचना ही वर नमूद केलेली आहे.