कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत १८ पदांसाठी भरती सुरु
Jilhadhikari Karyalay Kolhapur Bharti 2024 :
जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याच्या नव्याने गठीत करण्यात येणाऱ्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका/नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, शाळा/कॉलेज प्रतिनिधी, वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी, व्यापार आणि उद्योग क्षेत्र, पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधी या पदांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज कसा करावा? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? याविषयी आपण जाणून घेणार आहोत
पदाचे नाव – जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
- जिल्हा परिषद सदस्य
- नगरपालिका/नगरपालिका सदस्य
- पंचायत समिती सदस्य
- कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी
- शाळा/कॉलेज प्रतिनिधी
- वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी
- व्यापार आणि उद्योग क्षेत्र
- पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी
- शेतकरी प्रतिनिधी
पदसंख्या – एकूण १८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदांनुसार जागा खालीलप्रमाणे –
- जिल्हा परिषद सदस्य – ०२
- नगरपालिका/नगरपालिका सदस्य -०२
- पंचायत समिती सदस्य -०२
- कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी -०२
- शाळा/कॉलेज प्रतिनिधी -०२
- वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी -०२
- व्यापार आणि उद्योग क्षेत्र -०२
- पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी -०२
- शेतकरी प्रतिनिधी -०२
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली अधिसुचना नीट वाचावी लागेल.
अर्ज पद्धती – वरील पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. “जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर” या पत्त्यावर अर्ज पाठवावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – वरील पदांसाठी तुम्ही १५ एप्रिल २०२४ या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईट – याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://kolhapur.gov.in/ या लिंकवर क्लिक करावे.