पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!
PCMC Fire Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेतर्फे “फायरमन रेस्क्यूअर”पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत १५० पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड हे आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज २६ एप्रिल २०२४ पासून सुरू होतील. ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख १७ मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : फायर रेस्क्यूर पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराची मर्यादा ३० वर्ष आहे.
अर्ज शुल्क : मागार प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर खुल्या प्रर्वगातील १००० रुपये परिक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याची अंतिम मुदत १७ मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. परिक्षेच्या ०७ दिवस आधी ऑनलाई परिक्षेसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईट https://www.pcmcindia.gov.in/ वर उपलब्ध होईल .
शैक्षणिक पात्रता : फायरमन रेस्क्यूर पदासाठी अर्ज करण्यासाठी माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण असावा. तसेच एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा
वेतनश्रेणी (Salary) : फायरमन रेस्क्यूर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराल एस-६ नुसार १९,९००-६३,२००पर्यंत पगार मिळू शकतो.
अर्ज करण्याची थेट लिंक – https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32281/88458/Index.html