बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश

बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश

आपल्या देशात वैद्यकीय क्षेत्र हे करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी तरुण या क्षेत्रात त्यांचे करिअर घडवण्यासाठी अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. यात अनेक पालकांचेही आपल्या मुलाने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावे असे स्वप्न असते. कारण आपल्या देशात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. याशिवाय तुम्ही देशसेवेसोबतच चांगला पगारही असतो आणि नावासोबतच तुम्हाला समाजात प्रसिद्धीही मिळवता येते.

तुम्हीसुद्धा सायन्समधून १२ वी उत्तीर्ण असाल, तुम्हालाही या क्षेत्रात पुढे करिअर करायचे असेल, तर बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही एमबीबीएस, बीडीएस, बीएस्सी नर्सिंग, बीफार्मा यांसह विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. हे अभ्यासक्रम कशाप्रकारे आहेत जाणून घेऊ….

एमबीबीएस
आपल्या देशात एमबीबीएस डॉक्टरला वैद्यकीय क्षेत्रात सर्वोच्च दर्जा मिळतो. १२ वी पूर्ण केल्यानंतरच तुम्ही एमबीबीएस अर्थात बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरीमध्ये प्रवेश घेऊ शकता. हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यात चार वर्षांचा अभ्यास आणि एक वर्षाची इंटर्नशिप असते. एमबीबीएसमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला NEET परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

बीडीएस
वैद्यकीय क्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएसशिवाय बीडीएस हाही चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये दातांचा डॉक्टर बनण्याचा अभ्यास असतो. बीडीएसला बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी म्हणून ओळखले जाते. बीडीएसमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

बीएस्सी नर्सिंग
जर तुम्ही NEET परीक्षा पास करू शकला नाही तर B.Sc नर्सिंग हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, यामध्ये तुम्ही नर्सिंग संबंधित अभ्यास करू शकता.

या सर्वांशिवाय वैद्यकीय क्षेत्रात अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही बारावी पूर्ण केल्यानंतरच प्रवेश घेऊ शकता. यामध्ये BPharma आणि नंतर DPharm, BAMS, BUMS BTP सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन वैद्यकीय क्षेत्रात नाव कमवता येते.

Leave a Comment