मुंबईच्या वस्त्रोद्योग समिती येथे भरती सुरू !
Textiles Committee Mumbai Bharti 2024 : वस्त्रोद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई येथे भरती सुरू आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चार रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. तसेच पात्र पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, अर्ज कसा करायचा, मुलखातीचे स्थळ याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पदे व पदसंख्या –
सल्लागार (Consultant) – १ जागा
तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – ३ जागा
शैक्षणिक पात्रता –
सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बी.ई. / बी.टेक. टेक्स्टाईल किंवा बी. / B.F. टेक. N.I.F.T कडून + वस्त्रोद्योगातील ५ वर्षांचा अनुभव असावा.
तांत्रिक अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बी.ई. / बी.टेक. टेक्स्टाईल किंवा बी. / B.F. टेक. N.I.F.T कडून + 2 वर्षांचा वस्त्रोद्योग आणि अध्यापनाचा अनुभव असावा.