सत्यनारायण नुवाल यांचा खडतर प्रवास रेल्वेस्थानकावर झोपण्यापासून ते ९२,००० कोटींची कंपनी उभारण्यापर्यंतचा जाणून घ्या !

सत्यनारायण नुवाल यांचा खडतर प्रवास रेल्वेस्थानकावर झोपण्यापासून ते ९२,००० कोटींची कंपनी उभारण्यापर्यंतचा जाणून घ्या !

Satyanarayan Nuwal  Success Story : रेल्वेस्थानकावरील बेंचवर झोपण्यापासून ते सेल्फ मेड अब्जाधीश होण्यापर्यंतचा सत्यनारायण नंदलाल नुवाल यांचा हा प्रवास प्रचंड आव्हानांनी भरलेला होता.
जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगत असतो. जगात प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला पोलिस व्हायचे असते, तर कोणाला व्यावसायिक व्हायचे असते. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात; तर काही जण थोड्या मिळालेल्या यशातही समाधानी होतात. पण, असेदेखील काही लोक असतात, संकटाला तोंड देऊन पुन्हा नवी सुरुवात करून आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत, जे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून आता अब्जाधीश आहेत.

रेल्वेस्थानकावरील बेंचवर झोपण्यापासून ते सेल्फ मेड अब्जाधीश होण्यापर्यंतचा सत्यनारायण नंदलाल नुवाल यांचा हा प्रवास प्रचंड आव्हानांनी भरलेला आणि कठोर परिश्रमाचा आहे. सत्यनारायण नंदलाल नुवाल हे सोलार इंडस्ट्रीज इंडियाचे संस्थापक आणि अब्जाधीश आहेत.

नुवाल यांचा जन्म राजस्थानमधील भिलवाडा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांना दहावीनंतर शाळा सोडावी लागली. पण, त्यांना लहानपणापासूनच उद्योग क्षेत्रात येण्याची इच्छा होती; त्यामुळे त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शाई उत्पादनाचा कारखाना सुरू केला. पण, त्यांचा हा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला; तरीही नुवाल हार न मानता नवी संधी शोधत राहिले. कठीण काळात त्यांना रेल्वेस्थानकावरही झोपावे लागले.

काही काळानंतर औद्योगिक स्फोटकांच्या उद्योग क्षेत्रात प्रवेश केल्याने नुवाल यांच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली. हा नुवाल यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला. स्फोटकांचा व्यापारी अब्दुल सत्तार अल्लाभाई यांच्या भेटीने त्यांचे आयुष्य बदलले. १९९५ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन त्यांनी सोलर इंडस्ट्रीज इंडियाची स्थापना केली. आज ही कंपनी ९२,००० कोटी रुपयांची आहे.

स्फोटक उद्योगात वाढ
सत्यनारायण नंदलाल नुवाल यांची सोलर इंडस्ट्रीज मेक इन इंडिया मिशनला पाठिंबा देत स्फोटके, प्रोपेलेंट्स, ग्रेनेड्स, ड्रोन आणि वॉरहेड्स बनवण्यात अग्रेसर बनली आहे. कंपनीचे बाजारमूल्य केवळ दहा वर्षांत १,७०० टक्क्याने वाढले आहे आणि नोव्हेंबर २०२२ पर्यंत ३५,००० कोटी रुपयांवर पोहोचले. माहितीनुसार, नुवाल यांची एकूण संपत्ती आता ४.९ अब्ज डॉलर्स आहे. तसेच त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना जगातील अब्जाधीश व्यावसायिकांमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे.

Leave a Comment