स्टील अ‍ॅथोरिटी ऑफ़ इंडिया कंपनीमध्ये ३१४ विविध पदांसाठी भरती – SAIL Recruitment 2024

स्टील अ‍ॅथोरिटी ऑफ़ इंडिया कंपनीमध्ये ३१४ विविध पदांसाठी भरती :

SAIL Recruitment 2024 :

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी स्टील अॅथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीमध्ये काम करण्याची संधी आहे. SAIL ने ऑपरेटर कम टेक्निशियन पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

314 जागांसाठी भरती स्टील अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाच्या SAIL Recruitment वतीने ट्रेनी ऑपरेटर कम टेक्निशियन (OCTT) पदाच्या एकूण 314 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा तसेच त्याने इंजिनिअरिंग डिप्लोमा (Engineering) शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. उमदेवाराची निवड झाल्यास नोकरीच्या ठिकाणी देशभरात कोणत्याही ठिकाणी निश्चित केले जाऊ शकते.

ट्रेनी ऑपरेटर पदाच्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे वय हे 18 मार्च 2024 रोजी 18 ते 28 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये 05 वर्षे अधिकची सूट देण्यात आली आहे. तर OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदारांकडून शुल्काची आकारणी करण्यात येणार असून मागासवर्गीय उमेदवारांना 200 रुपये तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. उमेदवारांनी हे शुल्क ऑनलाईन भरणा करायचे आहे.

या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (Online Form)सादर करायचा आहे. यासाठी SAIL च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.sail.co.in/) भेट द्यावी. तसेच आपला अर्ज सादर करताना शैक्षणिक माहिती अचूक आणि पूर्ण भरणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवारांचा अर्ज बाद ठरवण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी SAILची अधिकृत जाहिरात पाहावी.

 

Leave a Comment