दहावी-बारावीचे २६ जुलै रोजी होणारे supplementary पेपर रद्द करण्यात आले, जाणून घ्या !

दहावी-बारावीचे २६ जुलै रोजी होणारे supplementary पेपर रद्द करण्यात आले, जाणून घ्या !

10th and 12th supplemetary exam :

मुंबई महानगर प्रदेशासह राज्यभरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. दहावी-बारावीचे २६ जुलै रोजी होणारे पेपर रद्द करण्यात आले असून त्याच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीचे हे पेपर ३१ जुलै रोजी, तर १२वी चे पेपर ९ ऑगस्ट रोजी होतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक याआधी जाहीर केले होते. या परीक्षा इयत्ता बारावीसाठी १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आणि दहावीसाठी १६ जुलै ते ३० ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. या परीक्षेत दहावीचा विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर २६ जुलै रोजी होणार होता. तर बारावीचे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान आणि एमसीव्हीसी या विषयांचे पेपरही २६ जुलै रोजी नियोजित होते.

राज्यात पुणे, कोकण, मुंबई भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने गुरुवारी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. शुक्रवारीही पावसाचा अंदाज असल्याने पुण्यातील शाळांना सुटी जाहीर झाली आहे. त्या अनुषंगाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे शुक्रवारचे पेपर पुढे ढकलले आहेत.

आता दहावीचा पेपर ३१ जुलै रोजी सकाळी होईल. तर बारावीचे तीनही विषयांचे पेपर ९ ऑगस्ट रोजी होणार आहेत. या दृष्टीने मंडळाने परीरक्षकांना प्रश्नपत्रिका व्यवस्थित पेट्यांमध्ये सीलबंद अवस्थेत सुखरूप ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

 

 

Leave a Comment