11th Admission 2022 – अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, ‘या’ तारखा तुमच्यासाठी IMP; ऑफलाईन प्रवेश झाले सुरु

11th Admission 2022 Maharashtra – महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात अकरावी प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया (Class 11th Online Admission process) सुरू करण्यात आली आहे. यंदा ही प्रवेश प्रक्रया दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच निकालाआधी विद्यार्थ्यांना त्यांची माहिती भरून नोंदणी करायची आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणेजच भाग-I 30 मे पासून सुरू झाला आहे. या तारखेपासून 11 वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी (Class 11th Online Admission) सुरू करू शकत होते. तसेच दहावीचा निकाल (Class 10 Results) जाहीर झाल्यानंतर या अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येणार होता. मात्र CBSE चे निकाल रखडल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा रखडला आहे. पण आता अकरावीचे ऑफलाईन प्रवेश (Class 11th Offline Admission process) सुरु करण्यात येणार आहेत. ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

  • अकरावीच्या ऑफलाईन प्रवेशासाठी 23 जुलैपर्यंत प्रवेश अर्जाचे वितरण आणि संकलन करण्यात येणार आहे.
  • यानंतर 25 आणि 26 जुलैला गुणवत्तेनुसार सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे.
  • 27 ते 30 जुलै दरम्यान निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं काम होणार आहे.
  • 1 आणि 2 ऑगस्टला जागा शिल्लक असल्यास सिलेक्शन लिस्टमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत.
  • 3 आणि 4 ऑगस्टला दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत.

 

ऑनलाईन प्रवेशाचा दुसरा टप्पा

संबंधित अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा महाविद्यालयांची प्राधान्य यादी द्यावी लागेल. या प्राधान्य फॉर्ममध्ये किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची नावे भरता येतील. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

Leave a Comment