लाभार्थ्यांसाठी एकच संकेतस्थळ – A Unified Website for Beneficiaries

 

A Unified Website for Beneficiaries :राज्यातील विविध विभागांतर्गत कार्यरत सामाजिक महामंडळांद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आणि सर्व संवर्गातील लाभार्थ्यांसाठी एक केंद्रीकृत संकेतस्थळ उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व सामाजिक महामंडळांच्या लाभार्थ्यांसाठी एकत्रित ऑनलाइन संकेतस्थळ विकसित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

 

 

राज्यातील अनेक सामाजिक महामंडळे आणि नव्याने स्थापन झालेल्या महामंडळांद्वारे विविध योजना राबवल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी अधिक सुसंगत होण्यासाठी आणि सर्व लाभार्थ्यांना एकाच संकेतस्थळावर सेवा मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या उपक्रमाला मान्यता देण्यात आली.

लाभार्थ्यांसाठी एकच संकेतस्थळ - A Unified Website for Beneficiaries

नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे आणि पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या समावेशाने पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, आवश्यकतेनुसार इतर प्रशासकीय विभागांचे प्रधान सचिव, सचिव किंवा त्यांचे प्रतिनिधी विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होतील

Leave a Comment