नागपूर अग्निशामक विभागातील 70 टक्के पदे रिक्त !! ड्रायव्हर ते मुख्य अग्निशमन अधिकारी यांची पदे रिक्त
Agnishamak Bharti Nagpur 2022 – Fire department is facing a major crisis. 70% posts are vacant in the department. With three to four employees and officers retiring every month, the number of vacancies is increasing day by day. So there will be a chances of recruiting process in Nagpur Fire department Bharti 2022. Know More information at below
विभागात ७० टक्के पदे रिक्त
नैसर्गिक आपत्ती असो वा आगीची घटना घडल्यास अशा संकटकाळात महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी बचावासाठी तत्पर असतात. परंतु सध्या अग्निशमन विभाग मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. विभागात ७० टक्के पदे रिक्त आहेत. त्यात दर महिन्याला तीन ते चार कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने, रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. अशा परिस्थितीत मोठी घटना घडल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मनुष्यबळाची कमतरता
पावसाळ्याच्या दिवसात आपत्ती व्यवस्थापन विभागाला २४ तास सतर्क राहावे लागते. पूर परिस्थिती निर्माण झाली. वस्त्यात पाणी साचले वा घरात पाणी शिरले तर हाच विभाग मदतीसाठी धावून येतो. असे असतानाही विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, जुलै २०१९ मध्ये ५६ ड्रायव्हर, पाच फिटर व एका इलेक्ट्रिशियनची भरती करण्यात आली. ही भरती केली नसती तर परिस्थिती अधिकच बिकट झाली असती.
नागपूर महापालिकेतील सेवा प्रवेश नियमात बदल करून भरतीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु शासनाने आपला आस्थापना खर्च किती आहे, याची माहिती मागितली. याचे उत्तर पाठविल्यानंतर शासनाकडून भरतीला मंजुरी मिळण्याची आशा आहे. – राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी मनपा
अशी आहेत रिक्त पदे
- नऊ अग्निशमन केंद्र (फायर स्टेशन), आपत्ती निवारण कक्ष, अग्निशमन प्रशिक्षण केंद्रासाठी ६११ कर्मचारी व अधिकाऱ्यांची गरज आहे. परंतु विभागात १८० कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच ७० टक्के पदे रिक्त आहेत.
- वास्तविक आकृतिबंधानुसार १३ फायर स्टेशनसाठी ८७२ पदे मंजूर आहेत.
- मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी यांची पदे रिक्त आहेत.
- अग्निशमन केंद्र अधिकारी या ११ पैकी १० सहायक अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांच्या ३० पैकी २६, उपअग्निशमन अधिकाऱ्यांच्या ३० पैकी २०, प्रमुख अग्निशमन विमोचकांच्या ५६ पैकी २०, ड्रायव्हर-ऑपरेटरच्या ११२ पैकी ४३, वहन चालकांच्या ७ पैकी ७, अग्निशमन विमोचकाच्या ३४६ पैकी २८५, मुख्य मेकॅनिक १ पैकी १, फिटर कम ड्रायव्हरच्या १० पैकी ४ पदे रिक्त आहेत.
नागपूर अग्निशामक विभागातील पदभरतीला शासनाने स्वीकृती प्रदान केली
Agnishamak Bharti Nagpur 2021 – About 60 per cent posts of officers and employees are vacant in the fire and emergency services department of the NMC. Now Government has given an approval for filling vacant posts. Read Agnishamak Bharti Nagpur 2021 update at below
पदभरतीसाठी अग्निशमन समितीने ठराव मंजूर करून मनपा सभागृहाला पाठविला होता. सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर आता शासनाच्या नगरविकास विभागाच्या १८ मार्च, २०२१ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे.
महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. पदभरतीला मंजुरी मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर प्रमुख अग्निशामक विमोचक, अग्निशामक विमोचक व मुख्य मेकॅनिक कम ड्रायव्हर ही पदे भरण्याला व पदोन्नतीला शासनाने मंजुरी दिली आहे. पदभरतीसाठी अग्निशमन समितीने ठराव मंजूर करून मनपा सभागृहाला पाठविला होता. सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर आता शासनाच्या नगरविकास विभागाच्या १८ मार्च, २०२१ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे.
Agnishamak Bharti Nagpur 2021 – स्थानिक वृत्तपत्रातील बातमी नुसार नागपूर मधील अग्निशामक विभागाच्या भरतीचा पुढील मार्ग मोकळा झाला आहे. या नुसार लवकरच भरतीचे सूत्र हलणार असल्याचे चित्र आहे. सध्या शहराच्या विस्तार अनुरूप जवळपास ८०% पद रिक्त असल्याचे समजते. या मोठ्या भरतीला लवकरच सुरुवात होईल अशी अपेक्षा उमेदवारांना आहे.
HII MI HARSHAVARDHAN PLEASE JION MI
Jaldi karo