Pashusavardhan Vibhag Bharti 2022-AHD Maha Bharti

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 –  Animal Husbandry Minister Sunil Kedar informed the Legislative Council that the vacancies in the Animal Husbandry Department will be filled soon considering the increasing livestock and administrative needs of the department.

  • Talathi Bharti Update – 1 हजार तलाठय़ांची लवकरच भरती ; महसूलमंत्री थोरात यांची विधानसभेत घोषणा

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 Details

वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबत विधानपरिषद सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री श्री. सुनील केदार बोलत होते.

राज्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यांच्या निकषांबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. तसेच फिरते पशुवैद्यकीय दवाखाना म्हणून ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा सुरु करण्यात आली आहे असेही श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेमध्ये विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला होता.


Pashusavardhan Vibhag Bharti 2022-AHD Maha Bharti Recruitment 2022 through MPSC : Maharashtra Animal Husbandry Service, Group-A – Advertisement has issued under MPSC. Maharashtra Public Service Commission (MPSC) has invites online applications for the “Livestock Development Officer”. The required number of candidates to fill this vacant positions for MPSC Livestock Development Officer are 224 .  Those candidates who wish to apply for MPSC AHD Bharti 2022, MPSC AHD Recruitment 2022 can apply Online from 14th Feb 2022  and the last date to apply for MPSC Livestock Development Officer Job Vacancy 2022 is 31 January 2022. More details about MPSC AHD Recruitment 2022, MPSC AHD Vacancy 2022 are as given below: Online Link will be activated from 14th February 2022.  The due date for MPSC AHD Online Application 2022  is 7th March 2022.  More details about MPSC AHD  Recruitment 2022, Pashusavardhan Vibhag Bharti 2022, Pashusanvardhan MPSC Bharti 2022, Pashudhan Vikas Adhikari Bharti 2022, MPSC Livestock Development Officer Recruitment 2022, MPSC LDO Recruitment 2022, MPSC LDO Bharti 2022, MPSC LDO Vacancy 2022, AHD LDO Jobs 2022 are as follows:

MPSC LDO Recruitment 2022 – Vacancies: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अस्थापनेवरील पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer) पदांच्या एकूण 224 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज  मागविण्यात येत आहेत.

अ. क्र. पदाचे नाव  रिक्त पदे
1 पशुधन विकास अधिकारी 212 Posts
2 पशुधन विकास अधिकारी (अनुशेषाची पदे) 12 Posts
एकूण 224 Vacancies 

Pashusavardhan Bharti 2022 Maharashtra

AHD Maha Bharti Recruitment 2022 – महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “पशुधन विकास अधिकारी” पदांच्या एकूण 224 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव –पशुधन विकास अधिकारी
  • पद संख्या – 224 जागा
  • फीस –
    • अराखीव प्रवर्ग – रु.394/-
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 294/-
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2022

अर्ज कसा करावा  – How To Apply For Maharashtra Animal Husbandry Service Bharti 2022

  • Visit @mpsc.gov.in, the official website of Maharashtra Public Service Commission
  • Click on the tab ‘Online Facilities’ on the home page.
  • Click on ‘Online Application System’ under the ‘Online Facilities’ Tab.
  • Click the ‘User Registration’ Highlight on the right side of the new page that appears.
  • Register yourself for MPSC Maharashtra Animal Husbandry Service Notification 2022.
  • Apply after Login with your credentials.
  • Download your application form and take a printout for future reference.
  • Major Changes In MPSC ExaminationMPSC अभ्यासक्रमात अचानक मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या पदांसाठी ?

रिक्त पदांचा तपशील – MPSC AHD Bharti 2022

Livestock Development Office 224 Posts

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 Pashusavardhan Vibhag Bharti 2022

पात्रता – AHD maha MPSC Bharti 2022 Educational Deatils

  • पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुसंवर्धन यामधील पदवी – Degree in Veterinary Medicine or Animal Husbandry

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pashusavardhan Vibhag Bharti 2022

अर्ज करा
जाहिरात-2
जाहिरात-1
अधिकृत वेबसाईट

नोंदणी व मुद्रांक या विभागाची ही पदे MPSC आणण्याची प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेत होऊ शकत समावेश 


Pashusavardhan Vibhag Bharti 2022-AHD Maha Bharti Recruitment 2022 through MPSC : Maharashtra Animal Husbandry Service, Group-A – Advertisement has issued under MPSC. Maharashtra Public Service Commission (MPSC) has invites online applications for the “Assistant Commissioner Animal Husbandry”. The required number of candidates to fill this vacant positions for MPSC Assistant Commissioner Animal Husbandry are 38.  Online Link will be activated from 14th February 2022 The due date for MPSC AHD Online Application 2022  is 14th March 2022.  More details about MPSC AHD  Recruitment 2022, Pashusavardhan Vibhag Bharti 2022, Pashusanvardhan MPSC Bharti 2022, Pashudhan Vikas Adhikari Bharti 2022, MPSC Assistant Commissioner Animal Husbandry Recruitment 2022, MPSC ACAH Recruitment 2022, MPSC ACAH Bharti 2022, MPSC Vacancy 2022, AHD Jobs 2022 are as follows:

MPSC LDO Recruitment 2022 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अस्थापनेवरील सहायक आयुक्त पशुसंवर्धन (Assistant Commissioner Animal Husbandry) पदांच्या एकूण 38 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज  मागविण्यात येत आहेत.

  • पदाचे नाव –सहायक आयुक्त पशुसंवर्धन
  • पद संख्या – 38 जागा
  • फीस –
    • अराखीव प्रवर्ग – रु.394/-
    • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ – रु. 294/-
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2022

अर्ज कसा करावा  – How To Apply For Maharashtra Animal Husbandry Service Bharti 2022

  • Visit @mpsc.gov.in, the official website of Maharashtra Public Service Commission
  • Click on the tab ‘Online Facilities’ on the home page.
  • Click on ‘Online Application System’ under the ‘Online Facilities’ Tab.
  • Click the ‘User Registration’ Highlight on the right side of the new page that appears.
  • Register yourself for MPSC Maharashtra Animal Husbandry Service Notification 2022.
  • Apply after Login with your credentials.
  • Download your application form and take a printout for future reference.

रिक्त पदांचा तपशील – MPSC AHD Bharti 2022

Assistant Commissioner Animal Husbandry 38 Posts

 

पात्रता – AHD maha MPSC Bharti 2022 Educational Deatils

  • पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुसंवर्धन यामधील पदवी – Degree in Veterinary Medicine or Animal Husbandry

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pashusavardhan Vibhag Bharti 2022

अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

MPSC LDO Bharti 2022

Pashusavardhan Vibhag Bharti 2022-AHD Maha Bharti Recruitment GR : Out of 49 posts of Animal Husbandry Development Officers, only 18 posts have been sanctioned and 31 posts are vacant. As three officers are on leave in Corona, 15 officers have been given the responsibility of two to three talukas and they have to work hard and the livestock is in trouble. It is learned that 423 posts are vacant in the state. Know More details about Maharashtra Animal Husbandry Development Officers Bharti 2022 at below

जिल्ह्यात तेरा तालुक्यातील 1934 गावात असणारे गाय, बैल, म्हशी, शेळी यासह कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच गोरगरीबांना विशेष घटक योजनेत मिळणारे अनुदान मंजुरीच्या कामात 49 पशुसंवर्धन विकास अधिकारी पदापैकी केवळ 18 पदे मंजूर असून 31 पदे रिक्त आहेत.

कोरोना बाधीत तीन अधिकारी सुट्टीवर असल्याने 15 अधिकार्‍यांना दोन ते तीन तालुक्याची जबाबदारी दिल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून पशुधन अडचणीत साडपले आहे. राज्यातील 423 पदे रिक्त असल्याची माहिती समजली आहे.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकारी डॉ. तृप्ती पाटील या पुणे येथे लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी गेल्या आठवड्यात रजेवर होत्या. त्यांना कोरोनाची लक्षण जाणवत असल्याने त्यांचा अहवाल कोरोनाबाधीत आल्याने त्या दिर्घ रजेवर गेेल्या आहेत. त्यांचा पदभार चिखली येथील तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दांडगे यांना सोपविण्यात आला आहे. मुळात दांडगे यांच्याकडे लोणार तालुक्याचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे त्यांना लोणारचे दर्शन महिन्यातून दोनदा होते. येथील शेतकरी व पशुधन योजनेचा लाभ घेतांना अनेक प्रकरण प्रलंबित राहतात. जळगांव जामोद, संग्रामपूर, सोनाळा तालुक्यातील 120 गावांची जबाबदारी पशुधन पर्यवेक्षकाकडे सोपविण्यात आली आहे. या तालुक्यातील अनुचित जमाती दुधाळ जनावरे, विशेष घटक योजना लाभार्थीचे प्रकरणे वर्षभरापासून राष्ट्रीकृत बॅकांनी मंजूर करून अनुदानाचा धनादेश संबंधित बँक खात्यात पाठविण्याचे लेखी पत्र जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांना जानेवारी 21 मध्ये पाठविले. या प्रकरणाची कोषागार कार्यालयाकडे योजनेतील तृटी सादर करण्यासाठी पुन्हा लाभार्थ्याची यादी पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाली आहे. वर्षभरापासून दुधाळ जनावरे व शेळी पालन अनुदान न मिळाल्याने संपप्त झालेल्या शेतकरी व पशुधन पालकांनी येत्या 26 जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दि. 17 रोजी जिल्हा पशुधन संवर्धन अधिकारी यांना दिला आहे.

 


Pashusavardhan Vibhag Bharti 2022 – Maharashtra Pashusavardhan Vibhag is going to recruit candidates for vacrious Group A, Group B, Group C and Group D Posts. In First Phase total 467 vacant posts will get filled for Krishi Vibhag, Pasgusavrdhan Vibhag, Maharashtra Rajya Vakhar Mahamandal and Other deaprtment. For this GR has been issued on official Site of Maharashtra Government to recruit the manpower to complete the Maharashtra State Agribusiness and Rural Transformation Project (SMART). As soon as this posts get filled, MH Govt will planning to fill next 504 vacant posts. So in Up Coming Days we can expect that there will be Big recruitment in MH Pashusavrdhan Vibhag 2022…Know More at below

AHD Maharashtra Recruitment 2022

MPSC LDO Bharti 2022 Details

Download Pashusavardhan Vibhag Bharti 2022 Full GR


राज्यात पशुधन अधिकाऱ्यांची बरीच पदे रिक्त !! भरती प्रक्रियेबद्दल कार्यवाही करण्याची मागणी लवकरच 

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 – In Maharashtra Livestock Development Board there is 900+ vacant posts of livestock officers which should be filled as sson as Possible. Below we have share an image showing how much Posts are vacant district wise. Read latest update about Pashusavardhan Vibhag Bharti 2022 under the MPSC LDO Bharti 2022

पशुसंवर्धन विभागाचा शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने या विभागातील प्रत्येक पद अत्यंत महत्वाचे आहे. परंतु या विभागात पशुधन अधिकाऱ्यांची बरीच पदे रिक्त आहेत . राज्यात जवळपास ९०६ पदे रिक्त आहे तर धुळे जिल्यात तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत.अधिक माहिती खाली बघा

Pashusavardhan Vibhag Bharti 2021

आमदार नितीन पवार यांनी म्हटले आहे कि ग्रामीण भागातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी पशुसंवर्धन  विभागाच्या मंत्र्यांना भेटून लवकरच भरती प्रक्रियेबद्दल कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येईल ..


महाराष्ट्र पशुधन विकास मंडळात तब्बल इतकी पदे रिक्त 

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 -There is a demand from the officers and staff that the posts of Data Manager or Statistics (Vacancies in Maharashtra Livestock Development Board) should be filled in the Maharashtra Livestock Development Board. Read Latest Update on Pashusavardhan Vibhag Bharti 2022, AHD Maharashtra Recruitment 2022, Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022 in this post

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2022

उच्च प्रतीच्या वळूंची निर्मिती, पालनपोषण करणे व कृत्रिम रेतनासाठी तो इतर संस्थांना पुरविणे आदी पशुधन विकास मंडळाच्या जबाबदाऱ्या आहेत. मंडळाच्या प्रमुख कार्यालयात स्थानिक भागातील गायींसह इतर जातीच्या गाय, म्हैस येथूनच विविध शासकीय संस्थांना उपलब्ध करून दिले जातात. विशेष म्हणजे जनावरांच्या जातीनिहाय डेटा अपडेट ठेवणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. देशी गायींचा डेटा जर काळजीपूर्वक व्यवस्थित ठेवण्यात आला तर तो निश्चितपणे भविष्यकाळात उपयोगी पडणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.  त्यामुळे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळात डेटा मॅनेजर किंवा सांख्यिकीची पदे भरण्यात यावी, अशी मागणी अधिकारी व कर्मचारी वर्गातून होत आहे.

AHD Maharashtra Recruitment 2022

राज्याच्या मागासलेल्या भागात संकरित पशुपैदासीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून दुग्धोत्पादन व ग्रामीण रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ या स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली. मंडळासाठी ५६६ पदांची निर्मितीही करण्यात आली. परंतु, मंडळाचा कारभार सध्या १५० जणच हाकत असून तब्बल ३६६ पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी अनेक कामे खोळंबली असून शासनाच्या दुर्लक्षामुळे एकाच व्यक्तीला अनेकांची कामे करावी लागत आहे.

‘पशूधन’ची पदनिहाय स्थिती –  Vacant Post In Pashusavardhan Vibhag Bharti 2022

  • मंजूर पदे ५१६
  • रिक्त पदे ३६६
  • भरलेली पदे १५०
  • (जानेवारी २०२१ पर्यंत)

 जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात जाणून घ्या किती पदे रिक्त ?

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 – As there are eight vacancies of class two in the Animal Husbandry Department of the Zilla Parishad, the administrative work is being affected to a great extent. Check below Update

Zilla Parishad Pashu Vibhag Bharti 2022

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात  वर्ग दोनची आठ पदे रिक्त आहेत. त्यातही पशुवैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी ‘पदवीधर’ सापडत नसल्याने शवविच्छेदन अहवाल व इतर जबाबदार प्रस्ताव, कागदपत्र, प्रमाणपत्र देण्यातही अनेक वेळा अडचणी येतात. रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे अनेक वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले. पाठपुरावाही सुरू आहे; परंतु रिक्त पदांचा प्रश्न २ जूनपर्यंतही निकाली निघालेला नाही.

जिल्ह्यातील श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ अशा एकूण ५८ पशुवैद्यकीय दवाखाना व उपचार केंद्रांमधून जनावरांना वैद्यकीय सेवा दिली जाते. जिल्ह्यात साडेतीन लाखांच्या आसपास पशुधन असून, पशुधनाचे ‘आरोग्य’ सांभाळण्यासाठी श्रेणी एकच्या दवाखान्यावर एलडीओ दर्जाची २१ पदे मंजूर आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची काही पदे रिक्त असल्याने या पदांचा प्रभार कार्यरत अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.


  पशुधन विकास अधिकारी पदासाठी वाचा शासनाचा निर्णय व महाराष्ट्र व्हेटरनरी स्टुडंट असोसिएशनची मागणी !!

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 –  पशुधन विकास अधिकारी पदासाठी एमपीएससीद्वारे झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता हे पद आता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य शासनाने २४ मार्च २०२१च्या निर्णयानुसार जाहीर केला आहे. शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात पशुवैद्यक पदवीधरांमध्ये असंतोष असून हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली जात आहे.

सर्व अर्थव्यवस्था कोलमडून पडली असताना कृषी व्यवसाय इतर अर्थव्यवस्थेस पाठबळ देत आहेत. असे असतानाही शासनाने पशुधन विकास अधिकारीपद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याने महाराष्ट्र व्हेटरनरी स्टुटंड असोसिएशनने याचा विरोध केला आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात २१९२ पशुधन विकास अधिकारी गट-अ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या फक्त १६५७ पदांवर पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहेत तर जवळपास ५३५ मंजूर पदे रिक्त आहेत. तरीही शासनाने बर्ड फ्लू टळल्याचे कारण सांगून कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. पण सदर रिक्त पदांसाठी राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ऑगस्ट २०१९ला ४३५ जागांची जाहिरात प्रसिद्ध करत डिसेंबर २०१९ मध्ये त्यांची परीक्षाही घेतली. ही परीक्षा होऊन १६ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही अद्याप निकाल प्रलंबित आहे.

महाराष्ट्र व्हेटरनरी स्टुडंट असोसिएशनची मागणी

  • चार वर्षांपासून पशुसंवर्धन विभागात भरती न झाल्यामुळे राज्यामध्ये हजारो पदवीधर पशुवैद्यक शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
  • पशुधन विकास अधिकारी गट-अ हे पद मानधनावर भरल्याने या पदाचे महत्त्व कमी होईल.
  • तसेच पदवीधर पशुवैद्यकांसाठी रोजगार निश्चिती राहणार नाही.
  • त्यामुळे शासनाने कंत्राटी पद्धतीने पशुधन विकास अधिकारी पदभरतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.

खुशखबर !! पशुसंवर्धन विभागातील “या” संवर्गातील रिक्त पदे भरण्यास शासकीय मान्यता

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 – Good New For Candidates, as Administrative approval for outsourcing of vacant posts of Livestock Supervisor in the Department of Animal Husbandry. Soon Recruitment process of Department of Animal Husbandry will start. Government approval Notice for this has been Published on Official site. So candidates read below information and follow MahaBharti.co.in for future updates on Pashusavardhan Vibhag Bharti 2022

लवकरच पशुसंवर्धान विभागामध्ये भरती

पशुसंवर्धान विभाग भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना दिलासा !! अखेर शासनाने पशुधन पर्यवेक्षक या संवर्गातील रिक्त पदे बाह्यस्त्रोतामार्फत (Out Sourcing) उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. लवकरच पशुसंवर्धान विभागामध्ये भरती होणे अपेक्षित आहे . उमेवार जे या भरतीच्या प्रतीक्षेत असतील तर हा महत्वाचा अपडेट वाचा व गरजू लोकांना त्वरित कळवा, तसेच पुढील सर्व अपडेट्स आणि माहितीसाठी www.MahaBharti.co.in ला भेट द्यायला विसरू नका. आम्ही पुढील सर्व अपडेट्स येथे प्रकाशीत करूच.

राज्यात पशुसंवर्धान विभागात पशुधन पर्यवेक्षक गट क या संवर्गातील एकूण ७७८ पदे मंजूर असून ३७८ पदे रिक्त आहे . राज्यात रोज नवनवीन ठिकाणी बर्ड फ्ल्यू बाधित प्रकरणे समोर येत आहेत त्या अनुषंगाने अत्यावश्यक्य पदे त्वरित भरण्यासाठी निर्णय घेतला आहे . जे उमेदवार या भरतीस पात्र असतील त्यास रु १५,००० मानधन देण्यात येईल, तसेच सादर भरती प्रक्रिया हि शिफारसपात्र उमेदवार मिळेपर्यंत कालावधीपर्यंत किंवा  ११ महिन्यांसाठी तात्पुरता स्वरूपात असेल. हा नवीन शासन निर्णय 3 मार्च २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे.

वाचा काय आहे शासन निर्णय ?

PashuSavrdhan Vibhag Bharti 2021
PashuSavrdhan Vibhag Bharti 2021 Details GR

Read Pashusavardhan Vibhag Bharti 2021 Full GR -Click Here


राज्यात पशुसंवर्धन विभागातील ७६ टक्के पदे रिक्त

Pashusavardhan Vibhag Bharti 2022 – As 76 per cent posts are vacant in the Animal Husbandry Department in the state. Since the Department of Animal Husbandry has a direct relationship with the farmers, every position in this department is very important. But the fact that the state government is not serious about filling the vacancies has led to the death of farmers’ livestock due to bird flu and other diseases, according to veterinarians.

शेतीपूरक उद्योगावर आलेलं संकट दूर करण्यासाठी पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागात आवश्यक पशु वैद्यकांची नोकरभरती सरकार टाळत असल्याचा आरोप पशु वैद्यकीय स्नातकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यानी या प्रकरणात जातीने लक्ष घालून पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागात महिनोंमहिने प्रलंबित असलेल्या नोकर भरतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.

Maharashtra Department of Animal Husbandry Recruitment 2022

Maharashtra Department of Animal Husbandry Recruitment 2022– राज्यात पशुसंवर्धन विभागातील ७६ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पशुसंवर्धन विभागाचा शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने या विभागातील प्रत्येक पद अत्यंत महत्वाचे आहे. मात्र रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्यामुळेच बर्ड फ्ल्यू आणि इतर प्रकारच्या आजाराने शेतकऱ्यांचे पशुधन मृत्यूमुखी पडत असल्याचे वास्तव पशुवैद्यकांनी मांडले आहे.

बर्ड फ्ल्यू कसा रोखणार?

राज्यात रोज नवनवीन ठिकाणी बर्ड फ्ल्यू बाधित प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे त्या-त्या भागात पक्षी नष्ट करावे लागत असून त्यामुळे कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र, शेतीपूरक उद्योगावर आलेलं संकट दूर करण्यासाठी पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागात आवश्यक पशु वैद्यकांची नोकरभरती सरकार टाळत असल्याचा आरोप पशु वैद्यकीय स्नातकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यानी या प्रकरणात जातीने लक्ष घालून पशु संवर्धन व दुग्ध विकास विभागात महिनोंमहिने प्रलंबित असलेल्या नोकर भरतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. जनावरांच्या आरोग्यासाठी पशु संवर्धन विभागाचा कणा म्हणून काम करणाऱ्या पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांचे पद भरण्याकडे अनास्था असलेलं शासन बर्ड फ्ल्यू सोबत कसे लढणार? असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे

पशुसंवर्धन विभागातील ७६ टक्के पदे रिक्त

राज्यात केवळ १७६५ संवर्धन विकास अधिकारी कार्यरत – वेटरनरी कॉऊन्सिल ऑफ इंडियाच्या निकषांप्रमाणे राज्यात किमान ६ हजार ७०० पशु संवर्धन विकास अधिकारी आवश्यक आहेत. मात्र,सध्या फक्त १ हजार ७६५ अधिकारी राज्यात कार्यरत आहेत. पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या या प्रचंड कमतरतेची समस्या स्वतः सरकारनेच निर्माण केली आहे. त्यामुळेच बर्ड फ्ल्यूसारख्या आपत्तीच्या काळात पशु संवर्धन विभाग पूर्ण शक्तीने शेतकऱ्यांच्या मदतीला उतरू शकत नसल्याचा आरोप पशु वैद्यकीय स्नातक विद्यार्थ्यांनी केला आहे. संवर्धन विकास अधिकाऱ्यांचे पदे इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त आल्यानेच राज्यावर बर्ड फ्ल्यूचे वादळ घोंघावत आहे. सरकारच्या या हलगर्जीपणाच्या धोरणामुळे राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध विकास विभाग “पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या” (वेटरनरी डॉक्टर्स ) प्रचंड कमतरतेचा सामना करतोय. त्यामुळे राज्यातील पशु पक्ष्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन शेतकऱ्यांचा नुकसान होत असल्याचा आरोप पशु वैद्यकीय स्नातकांनी केला आहे.
राज्यात ३ कोटी ३० लाख पशु पक्ष्यांची नोंदराज्यात २०१८ च्या पशुगणनेप्रमाणे ३ कोटी ३० लाख पशु-पक्ष्यांची नोंद आहे. वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाचे निकष आहेत की दर ५ हजार पशू पक्षींमागे किमान एक पशु संवर्धन अधिकारी ( पशु वैद्यक ) असायला हवा. त्या निकषांप्रमाणे राज्यात किमान सहा हजार सातशे पशु संवर्धन विकास अधिकारी आवश्यक असताना राज्याचा पशु संवर्धन आणि दुग्ध विकास विभाग अवघ्या १ हजार ७६५ पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर ३ कोटी ३० लाख पशु पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. डॉक्टर्सच्या याच कमतरतेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून त्यांचे पशुधन रोगांना बळी पडत असल्याचा आरोप पशु वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातक विद्यार्थ्यांनी केला आहे.
आरक्षणाच्या वादात अडकली नियुक्तीगेल्या काही वर्षांपासून विविध समाजाकडून आरक्षणाची मागणी केली आहे. नोकर भरती केल्यास विशिष्ट समाज नाराज होण्याची भीती राज्य सरकारला आहे, त्यामुळेच विविध जातींच्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे पशु संवर्धन विभागात अत्यंत आवश्यक भरती प्रक्रियेकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे आरोप स्नातक विद्यार्थ्यांनी केले आहेत. पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या ४३५ पदांसाठी २३ ऑगस्ट २०१९ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये त्यासाठी लेखी परीक्षा देखील घेण्यात आली. मात्र गेल्या १३ महिन्यात आरक्षणाच्या गुंत्यामुळे परीक्षेचा निकाल लावण्यात आलेला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2021– जिल्हा पशु वैद्यकीय विभागातील जिल्ह्यात श्रेणी १ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ४६ एवढी आहे. या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी वर्ग २ दर्जाच्या अधिकाऱ्यांची ४६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या १३ पदे कार्यरत असून, तब्बल ३३ पदे रिक्त आहेत. त्यात धुळे तालुक्यात १, साक्री तालुक्यात १५, शिंदखेडा तालुक्यात ९, शिरपूर तालुक्यात ८ पदे रिक्त आहेत. तर श्रेणी २ चे पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ७१ आहे. या ठिकाणी ७१ पशुधन पर्यवेक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ३४ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत.

तर तब्बल ३७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये धुळे तालुक्यात १६, साक्री तालुक्यात ५, शिरपूर तालुक्यात ७ तर शिंदखेडा तालुक्यात ७ पदे अनेक वर्षांपासुन रिक्%4 असल्याने अद्याप प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पशुप%Eलकांचीमोठ्या प्रमाणात गैरसाेय सहन करण्याची वेळे येते.

सोर्स:लोकमत


Pashusavardhan Vibhag Bharti 2021 – As the new bird flu crisis is looming over the state, the posts of Animal Husbandry Development Officers are vacant. While the state needs 6,600 Animal Husbandry Development Officers, only 1,763 officers are in service. So the big question is how the government will overcome the crisis in the absence of animal husbandry officers, who have the primary responsibility for controlling bird flu.

राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे नवे संकट घोंघावत असताना पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांची पदे  मात्र र%4क्त  आहेत. राज्यात ६ हजार ६०० पशुसंB5र्धन विकास अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ १७६३ अधिकारी सेवेत आहेत. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’वर नियंत्रणाची प्राथमिक जबाबदारी असणाऱ्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांअभावी सरकार या संकटावर कशी मात करणार, हा मोठाच प्रश्न  आहे.

देशभरात करोना प्रादुर्भावाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नसताना  मुंबई, पुणे, बीड, नागपूरसह अनेक शहरांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव झाला असून कावळे, पोपट आणि कोंबडय़ांचा मृत्यू झाला आहे.

‘व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडिया’च्या १९८४ च्या निकषानुसार, पाच हजार जनावरांमागे (पशु, पक्षी इ.) एक पशुवैद्यक (व्हेटरनरी डॉक्टर) असला पाहिजे. २०१९-२०च्या एका संशोधनानुसार, राज्यात ३ कोटी ३० लाख पशु, पक्षी असून निकषांनुसार ६,६०० पशुवैद्यकांची गरज आहे. मात्र, राज्यात केवळ २१९२ पदांना मंजुरी आहे. यापैकी १७६४ पदांवर भरती करण्यात आली आहे.

२००६ मध्ये ‘बर्ड फ्लू’ या विषाणूचा भारतात पहिल्यांदा प्रादुर्भाव दिसून  झाला होता. देशात या विषाणूमुळे पंधरा वर्षांत एकही व्यक्ती दगावली नसली तरी ‘बर्ड फ्लू’मुळे मोठय़ा प्रमाणावर पक्षी दगावत आहेत. कुक्कुटपालन व्यवसायावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहेत. मात्र, अशा साथ रोगांवर नियंत्रण मिळवणाऱ्या आरोग्य सुविधेची गावपातळीवर सोयच नाही. चार-पाच गाव मिळून एक पशुधन विकास अधिकारी असतो. त्यामुळे पक्षी, गुरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. असे असतानाही सरकारकडून पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे.

निकष काय?

शासन निर्णय ३०-४-१९९१ अन्वये राज्यात सन २००० नंतर दर ५००० पशुधन घटकामागे १ पदवीधर पशुवैद्यकीय दवाखाना स्थापन्यासंदर्भात राष्ट्रीय कृषी आयोगाने केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.   बिगर डोंगरी भागात दर ५००० पशुधन घटकामागे १ पशुवैद्यक दवाखाना असावा व डोंगरी भागात दर ३००० पशुधन घटकामागे १ पशुवैद्यक दवाखाना असायला हवा. मात्र, सरकारकडून  निकषानुसार पदभरती केली जात नसल्याचे चित्र आहे.

परीक्षा झाली, पण निकाल प्रलंबित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २३ ऑगस्ट २०१९ रोजी पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्यांच्या ४३५ पदांसाठी जहिरात देण्यात आली होती. यासाठी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील हजारो पदवीधरांनी  २२ डिसेंबर २०१९ ला परीक्षाही दिली. मात्र, वर्षभराचा कालावधी लोटला तरी परीक्षेचा निकाल व मुलाखती झालेल्या नाहीत. ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर तरी सरकारने तातडीने मुलाखत घेत नवीन पशुवैद्यकांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.


Pashusavardhan Vibhag Bharti 2021 – Mega recruitment will be started for about 3000 posts in the Animal Husbandry Department of the Government of Maharashtra. This will also fill the vacancies in the University of Animal and Fisheries Sciences, informed Sunil Kedar. Information on the recruitment process is expected to be released in a few days.

Maharashtra Pashusavardhan Vibhag Mega Bharti 2021: Every year Department Of Animal Husbandry Maharashtra recruited candidates for many vacant posts. This year Under AHD Maharashtra Bharti 2021, 3000 Posts will be filled…

Pashusavardhan Vibhag Bharti 2021

राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागात मेगाभरती निघणार असल्याने सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. या संदर्भातील माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागात सुमारे ३ हजार पदांसाठी मेगा भरती निघणार आहे. यामध्ये पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील जागाही भरल्या जाणार आहेत, अशी माहिती सुनील केदार यांनी दिली आहे. या भरती प्रक्रियेची माहिती काही दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारच्या अनेक विभागातील भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेल्या आहेत. परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने विविध विभागांमधील भरती प्रक्रियांना चालना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अधिसूचना लवकरच जाहीर करण्यात येईल.


Pashusavardhan Vibhag Bharti 2022 – AHD Maharashtra Bharti 2020 – Animal Husbandry Department, Government of Maharashtra has declared the new recruitment notification for the Chief Advisor post under AHD Maharashtra Recruitment 2022. There is a 01 vacancy available to fill with the posts. Eligible candidates send your application to the mentioned address before 28th August 2020. Further details are given below:-

AHD Maharashtra Bharti 2022 : पशुसंवर्धन विभाग पुणे येथे प्रमुख सल्लागार पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2020 आहे.

  • पदाचे नाव – प्रमुख सल्लागार
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Retired Officer
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पशुसंवर्धन आयुक्तालय स्पाइसर अ‍ॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी समोर औंध पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2020 आहे.

Information About Pashusavardhan Vibhag Bharti 2022

Pashusavardhan Vibhag Recruitment 2020  advertisement for Posts  of Pramukh sallagar is published now. respective details are given below.

Department Name Pashusavardhan Vibhag Bharti 2021
Name of the Posts Pramukh sallagar (Chief Advisior)
Total Vacancies 1 Post
Age Limit Retired Officers
Educational Qualification Read PDF
Application Mode Online
Official Website ahd.maharashtra.gov.in
Starting Date of Application 21 Aug 2020
Last Date of Application 28 August 2020

How to Apply For Pashusavardhan Vibhag Bharti 2022:

  • Apply offline mode for AHD Maharashtra Recruitment 2020
  • Eligible candidates submit your application to the given address
  • Applicants apply before the last date
  • Last date – 28th August 2020
  • Application Address –
    • पशुसंवर्धन आयुक्तालय स्पाइसर अ‍ॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी समोर औंध पुणे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For AHD Maharashtra Recruitment 2022

PDF जाहिरात : https://bit.ly/2CKA3SD
अधिकृत वेबसाईट : https://ahd.maharashtra.gov.in/

Following is the list of the AHD Departments :

Nagpur Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Nashik Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Aurangabad Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Pune Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Akola Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Amravati Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Buldhana Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Yavatmal Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Washim Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Gadchiroli Pashusavardhan Vibhag Bharti 2020, Beed Pashusavardhan Vibhag Bharti 2020, Jalna Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Osmanabad Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Latur Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Nanded Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Hingoli Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Parbhani Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Thane Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Palghar Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Raigad Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Ratnagiri Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Sindhudurg Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Bhandara Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Chandrapur Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Gondia Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Wardha Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Ahmednagar Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Dhule Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Jalgaon Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Nandurbar Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Kolhapur Pashusavardhan Vibhag Bharti 2020 2020,Sangli Pashusavardhan Vibhag Bharti 2020,Satara Pashusavardhan Vibhag Bharti 2020, Solapur Pashusavardhan Vibhag Bharti 2020.

 

Table of Contents

1 thought on “Pashusavardhan Vibhag Bharti 2022-AHD Maha Bharti”

Leave a Comment