अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS -नागपूर येथे नोकरीची संधी!

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS -नागपूर येथे नोकरीची संधी!

AIIMS Nagpur Recruitment 2024 : 

नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेंतर्गत सध्या ‘प्रोजेक्ट स्टाफ नर्स’ [Project Staff Nurse] या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत ते अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पाहावे. तसेस, या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख या सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्यावे.

पद आणि पदसंख्या :  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये प्रोजेक्ट स्टाफ नर्स या पदासाठी एकूण एका रिक्त जागेवर भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता :  प्रोजेक्ट स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालीलप्रमाणे शिक्षण असणे आवश्यक आहे –

उमेदवाराचे तीन वर्षांचे जनरल नर्सिंग आणि मिडवाइफ (GNM) कोर्समधील किमान द्वितीय श्रेणीतील किंवा समतुल्य CGPA असणारे शिक्षण पूर्ण असावे.

तसेच त्यांनी नोंदणीकृत परिचारिका अथवा ANM रजिस्टर्ड कोणत्याही राज्यातील नोंदणीकृत परिचारिका असणे आवश्यक आहे.

वेतन : प्रोजेक्ट स्टाफ नर्स या पदावर निवड झालेल्या उमेदवारास, दरमहा २३,६००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अधिकृत वेबसाईट लिंक – https://aiimsnagpur.edu.in/

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
या पदासाठी नोकरीचा अर्ज पाठविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

त्यासाठी अर्जाचा फॉर्म स्कॅन करून, idmodellingdhr@gmail.com या ई-मेल अॅड्रेसवर पाठवायचा आहे.

तसेच, अधिसूचनेमध्ये दिलेला गूगल फॉर्मदेखील भरायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांसाठी ३० वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

अर्ज पाठविल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

मुलाखतीवरून उमेदवारांची निवड करण्यात येईल.

वरील प्रोजेक्ट स्टाफ नर्स या पदासाठी नोकरीचा अर्ज उमेदवारांनी अंतिम तारखेआधी भरणे अनिवार्य आहे.

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही १५ जून २०२४ अशी आहे.

Leave a Comment