भारतीय लष्करात टेक्‍निकल एंट्री स्कीम! अर्ज प्रक्रियेला सुरवात!

जानेवारी 2022 मध्ये सुरू होणाऱ्या 10+2 टेक्‍निकल एंट्री स्कीम (Technical Entry Scheme – TES) अंतर्गत भारतीय लष्करात (Indian Army) उच्च माध्यमिक (सिनिअर सेकंडरी किंवा इंटरमिजिएट) नंतर टेक्‍निकल कोअरमध्ये TES-46 अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 8 ऑक्‍टोबर 2021 पासून सुरू झाली आहे. तथापि, भारतीय लष्कराने एम्प्लॉयमेंट न्यूज वीक 13-19 मार्च 2019 मध्ये प्रकाशित केलेल्या संक्षिप्त प्रकाशनानुसार, TES-46 अभ्यासक्रमासाठी अर्ज प्रक्रिया गुरुवार, 7 ऑक्‍टोबर 2021 रोजी सुरू होणार होती आणि शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2021 आहे. दुसरीकडे, 10+2 टेक्‍निकल एंट्री स्कीम 46 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याबरोबरच भारतीय सेनेने या भरतीसाठी तपशीलवार अधिसूचना देखील जारी केली आहे.

ऑनलाईन अर्ज कसा सादर कराल ? 

Army Technical Entry Scheme – TES 2021 TES-46 – आर्मी टेक्‍निकल एंट्री स्कीम हा भारतीय सैन्यात बारावीनंतर टेक्‍निकल कॉर्प्समध्ये भरतीचा पर्याय आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना भारतीय सैन्याच्या भरती पोर्टल joinindianarmy.nic.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर मेन पेजवर दिलेल्या ऑफिसर्स एंट्री अर्ज / लॉग इनच्या लिंकवर क्‍लिक करा. नंतर नवीन पेजवरील प्रथम नोंदणी लिंकवर क्‍लिक करून पुढे जावे लागेल आणि नंतर नवीन पेजवर दिलेल्या सूचना वाचून त्यानंतर विचारलेले तपशील (आधार क्रमांक, नाव, वडिलांचे / पालकांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, ई- मेल आणि मोबाईल नंबर) भरून नवीन पेजवर सादर करावे लागतील. त्यानंतर त्यांचे वापरकर्ता नाव (ई- मेल) आणि नोंदणीकृत पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून उमेदवार संबंधित भरतीसाठी अर्ज सादर करू शकतील.

या भरती साठी पात्रता काय असेल ?

भारतीय लष्कराने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) द्वारे या वर्षी घेण्यात आलेल्या JEE Main 2021 परीक्षेत निर्धारित किमान गुण म्हणून TES-46 साठी अर्ज करण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता निश्‍चित केली आहे. लष्कराने TES-46 साठी जारी केलेल्या तपशीलवार अधिसूचनेमध्ये किमान स्कोअर दिले जातील. याव्यतिरिक्त, उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयामध्ये किमान 60 टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

पूर्ण जाहिरात आणि माहीत साठी येथे क्लिक करा 

Leave a Comment