आता सहावी ते आठवीच्या मुलांसाठी Bagless Day !

आता सहावी ते आठवीच्या मुलांसाठी Bagless Day !

Bagless Day NEP 2020 : पारंपरिक शिक्षणासह व व्यावहारिक कौशल्ये एकत्रित करण्यात मदत करण्यासाठी शैक्षणिक धोरणात दहा दिवसांच्या बॅगलेस कालावधीची शिफारस करण्यात आली आहे

शिक्षण अधिक आनंददायी, अनुभवात्मक आणि तणावमुक्त करण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इयत्ता सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी बॅगलेस दिवस लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार विद्यार्थी दहा दिवस शाळेत दप्तराविना सहभागी होऊन व्यावसायिक प्रशिक्षण आणि हाताने शिकण्याच्या अनुभवांवर लक्ष केंद्रित करणार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

पारंपरिक शिक्षणासह व व्यावहारिक कौशल्ये एकत्रित करण्यात मदत करण्यासाठी शैक्षणिक धोरणात दहा दिवसांच्या बॅगलेस कालावधीची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार सहावी ते आठवीमधील सर्व विद्यार्थ्यांना दहा दिवसांच्या बॅगलेस उपक्रमात सहभागी होता येईल. हा उपक्रम नियमित अध्यापन-अध्ययन प्रक्रियेचा भाग म्हणून साजरा केला जाणार आहे. विद्यार्थी स्थानिक व्यावसायिकांसोबत कामाचा अनुभव घेतील. विविध हस्तकलांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेतील.

असे असेल शिक्षण

विद्यार्थ्याला सहावी ते आठवीदरम्यान एका छोटेखानी कोर्सला प्रवेश घ्यावा लागेल. त्यानुसार सुतारकाम, इलेक्ट्रिक वर्क, मेटल वर्क, बागकाम, मातीची भांडी बनविणे अशा व्यावसायिक हस्तकलेच्या नमुन्याचे सर्वेक्षण करण्यासोबतच, त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. भाजी मंडईला भेट देऊन पाहणी, धर्मादाय भेटी, पाळीव प्राण्यांच्या काळजीवर सर्वेक्षण आणि अहवाललेखन, पतंग बनविणे आणि उडविणे, पुस्तक मेळा आयोजित करणे, वटवृक्षाखाली बसणे, बायोगॅस संयंत्र आणि सौरऊर्जा पार्कला भेट देणे अशा पद्धतीने शिक्षण घ्यावे लागणार आहे.

 

Leave a Comment