महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीची संधी; लवकरच करा अर्ज !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीची संधी; लवकरच करा अर्ज !

Bank Recruitment 2024 : सरकारी बँकेत काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आता मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड येथे ट्रेनिंग असोसिएट व ट्रेनिंग ज्युनिअर ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सरकारी बँकेत काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आता मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड येथे ट्रेनिंग असोसिएट आणि ट्रेनिंग ज्युनिअर ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मात्र यापूर्वी देखील या सरकारी बँकेत पदभरती प्रक्रियेची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती . मात्र आता ती वाढवण्यात आली आहे.

MSC Bank Bharti 2024

त्यामुळे आता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना पुन्हा संधी उपलब्ध केली असून २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अशा तऱ्हेने सरकारी नोकरी मिळवण्याचे आणि करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही संधी आता महत्त्वाची ठरली आहे. जाणून घेऊया सविस्तर

पात्रता : या भरतीसाठी पात्र उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान ५० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने मॅट्रिक स्तरावर मराठी विषयाचा अभ्यास केलेला असावा. ट्रेनिंग असोसिएट पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला इंग्रजी किंवा मराठी टायपिंगचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

वयोमर्यादा : शैक्षणिक पात्रतेबरोबरच अर्ज करताना वयाची ही काळजी घेणे आवश्यक असणार आहे. ट्रेनिंग असोसिएट आणि ट्रेनिंग ज्युनिअर ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वय २१ ते ३२ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ३२ ते ३८ वर्षे आहे.

अर्ज कसा करावा

या भरतीचा अर्ज बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम वेबसाईट mscbank.com जाऊन होम पेजवर जाऊन करिअर बटणावर क्लिक करावे.

भरतीशी संबंधित अर्जाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करा. व अनेक तपशील भरून नोंदणी करा

नोंदणी नंतर आवश्यक असलेली तुमची संपूर्ण माहिती भरून घ्या.

त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.

शेवटी उमेदवाराला निर्धारित शुल्क जमा करून फॉर्म सबमिट करा.

त्यानंतर संपूर्ण फॉर्मची प्रिंट आऊट काढणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क : ट्रेन असोसिएट पदासाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराला ११८० रुपये शुल्क भरावे लागेल. तर ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर पदासाठी अर्ज भरण्यासाठी १७७० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

Leave a Comment