BARTI Competitive Exam Registration 2022

बार्टीकडून बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचं आयोजन, असा करा अर्ज

BARTI Competitive Exam Registration 2021-22 (BARTI Competitive Exam Registration 2022) :  As per the announcement made by Social Justice Minister Dhananjay Munde on October 30, a special training program for Scheduled Caste boys and girls has been published by Barti at 30 centers in the state. Accordingly, applications have been invited from eligible students through a detailed list of 30 centers through Barti. The application has also been made available on Barti’s official website barti.maharashtra.gov.in. Know More about BARTI Competitive Exam Registration 2022, BARTI Competitive Exam Registration 2021-22,  BARTI Application Form 2021, BARTI Registartion 2021, BARTI Competitive Exam Registration 2022 at below

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 22 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, प्रवेश परीक्षा 26 डिसेंबरला होणार आहे. बार्टीच्या barti.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर देखील सदर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

22 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी 22 डिसेंबर 2021 पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आलं आहे. तर, 26 डिसेंबरला लेखी परीक्षा होणार आहे.

BARTI Competitive Exam Application Form

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 30 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेनुसार अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टी कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बार्टी मार्फत 30 केंद्राच्या विस्तृत यादीसह पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच बार्टीच्या barti.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील सदर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन – BARTI Application Form 2021

बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी 09 डिसेंम्बर 2021 पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले आहे.

6 हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार – BARTI Registartion 2021

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षात दोन सत्रात मिळून 600 असे एकूण 18 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धी साठी प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये प्रतिमहिना प्रमाणे विद्यावेतन तसेच पोलीस भरती व तत्सम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी एकरकमी 3 हजार रुपये देण्यात येतील. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळालेले विद्यार्थी यांच्या प्रमाणावरून संबंधित केंद्रांचा दर्जा ठरविण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविता येईल. इच्छुक व पात्र असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

BARTI Competitive Exam Registration 2021

Sr.No. Title Category Download Date of Release
Bank, Railway and LIC Coaching Application Form
Online Forms
Download
(3.3mb) 
16-11-2021
Police & Military Coaching Application Form
Online Forms
Download
(3.3mb) 
16-11-2021
Police & Military Coaching Advertisement
Advertisements
Download
(3.3mb) 
16-11-2021
Bank, Railway and LIC Coaching Advertisement
Advertisements
Download
(3.3mb) 
16-11-2021

2 thoughts on “BARTI Competitive Exam Registration 2022”

Leave a Comment