BECIL अंतर्गत 68 जागांसाठी भरती; 35,400 रुपये पगार मिळणार , त्वरित करा अर्ज!
BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तंत्रज्ञ पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 असणार आहे.
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तंत्रज्ञ पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 असणार आहे.
रिक्त असलेले पद :
1. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
2. तंत्रज्ञ (Technician)
एकूण रिक्त पद संख्या : 68 पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
कुठे पाठवाल अर्ज?
अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री सुशील कृ. आर्य, प्रकल्प व्यवस्थापक (एचआर), ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (बीईसीआयएल), बीईसीआयएल भवन, C-56/A-17, सेक्टर-62, नोएडा-201307 (U.P)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024
वयोमर्यादा : 35 वर्षे
अर्जाचे शुल्क :
1. सामान्य/ओबीसी/माजी सैनिक/महिला : 590.00 रुपये
2. SC/ST/ EWS/PH : 295.00 रुपये
भरतीचा तपशील
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 36 पदे रिक्त
तंत्रज्ञ : 32 पदे रिक्त
शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : Bachelor’s degree
तंत्रज्ञ : B.Sc. in OT Technology, 12th Class pass with science and 5 years regular service in the
grade of O.T.A. at AIIMS
पगार :
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 35,400 रुपये प्रति महिना
- तंत्रज्ञ : 35,400 रुपये प्रति महिना
कसा कराल अर्ज?
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सलटंट इंडिया लिमिटेडच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://www.becil.com/