BIS भारतीय मानक ब्यूरोमध्ये नोकरीची संधी!

BIS भारतीय मानक ब्यूरोमध्ये नोकरीची संधी!

BIS Recruitment 2024 :

भारतीय मानक ब्युरो येथे सल्लागार या पदासाठी भरती सुरू आहे. या भरतीतून एकूण आठ जागा भरण्यात येतील. भरतीतील अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. अर्ज करतेवेळी इच्छुक उमेदवारांनी BIS कडून ठरवून देण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रते संदर्भातील सर्व प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक. या पदासाठीचे पात्रतेचे निकष जाणून घेऊ.

BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (bureau of indian standards) येथे सल्लागार पदासाठी भरती सुरू आहे. या पदाच्या एकूण आठ जागा रिक्त आहेत. या जागा मुंबई नागपूर आणि पुणे या शहरांमध्ये विभागलेल्या आहेत. भारतीय मानक ब्युरो येथे सुरू असलेल्या या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ही अर्ज प्रक्रिया दिनांक २९ जुलै २०२४ रोजी सुरू होईल तर १८ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख म्हणून नेऊन देण्यात आली आहे. या तारखेनंतर जमा केलेले अर्ज या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरतीत अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून मुलाखत पद्धतीने पात्र उमेदवारांची त्या त्या पदांवर नेमणूक करण्यात येईल. नेमणूक कंत्राटी तत्वावर असेल.

शैक्षणिक पात्रता-

  • भारतीय मानक ब्युरो येथील सल्लागारपदी रुजू होण्यासाठी पुढील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे-
  • मार्केटिंगमध्ये MBA.
  • मास कम्युनिकेशन विषयातील पदव्युत्तर शिक्षण.
  • मास्टर्स इन सोशल वर्क.
  • एम एस ऑफिस सारखे आयटी टूल्स वापरता येणे आवश्यक.
  • इंग्रजी आणि हिंदी भाषा लिहिता आणि बोलता येणे आवश्यक.
  • स्थानिक भाषा अस्खलित बोलता येत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा स्वतंत्र संस्थांमध्ये मार्केटिंग आणि मास्क कम्युनिकेशन या क्षेत्रातील दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक.

अर्ज भरतेवेळी वरती नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांचा पुरावा देण्यासाठी सर्व अधिकृत लेखी प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. भरतीत सहभाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, त्यांना कामाचा अनुभव आहे या संदर्भात हमी देणारे प्रमाणपत्र, इतर कोणत्या कोर्सेसचा किंवा अभ्यासक्रमांचा अभ्यास केला असल्यास त्या संदर्भातील हमी देणारे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

या भरतीविषयी आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड विषयी अधिक माहिती https://www.bis.gov.in/ या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येईल.

Leave a Comment