BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती ; अर्ज करा !

BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती ; अर्ज करा !

BMC Bharti 2024 :

बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक्झेक्युटिव्ह असिस्टंट या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदाच्या एकूण ३० जागा रिक्त आहेत. अर्ज प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ पर्यन्त सुरू असेल. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. कार्यकारी सहाय्यक पदी नेमणूक झाल्यावर दर महिना २२,०००/- इतके वेतन मिळेल. शैक्षणिक पात्रता जाणून घ्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. एक्झेक्युटिव्ह असिस्टंट या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण ३० जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून या भरतीची घोषणा करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवार या भरतीत ऑफलाइन पद्धतीने त्यांचे अर्ज सादर करू शकतात. अर्ज प्रक्रिया दिनांक ५ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल. दिनांक ९ ऑगस्ट २०२४ अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असेल. ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंतच अर्ज जमा करून घेतले जातील. ठरवून दिलेल्या वेळेनंतर जमा केलेले अर्ज या भरतीसाठी पात्र धरले जाणार नाहीत.

अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता:
बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक्झेक्युटिव्ह असिस्टंट म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदी नेमणूक झाल्यानंतर मुंबई हे नोकरीचे ठिकाण असेल. वय वर्ष १८ ते ३३ यामधील वय असलेले उमेदवारी या भरतीत सहभागी होऊ शकतात.

शैक्षणिक पात्रता –

  • १० वी उत्तीर्ण
  • वाणिज्य शाखेतून पदवीधर
  • विज्ञान शाखेतून पदवीधर
  • कला शाखेतून पदवीधर
  • कायदा पदवीधर
  • वरीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रमात कमीत कमी ४५% कोण असणे आवश्यक
  • संगणकीय ज्ञान असणे आवश्यक
  • उमेदवाराचा टायपिंग स्पीड किमान ३० शब्द प्रति मिनिट इतका असावा
  • उमेदवाराने MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

BMC, Important Documents: अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावीत

  • दोन पासपोर्ट साईज फोटोज
  • आधार कार्ड, पॅन कार्ड, वास्तव्याचा पुरावा
  • ओळख पुरावा
  • १० वी परीक्षेची गुणपत्रिका
  • १२ वी परीक्षेचे गुणपत्रिका
  • पदवी परीक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • टायपिंगची किमान ३० शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • कामाच्या अनुभवासंबंधीत असलेली इतर कागदपत्रे व प्रमाणपत्र

ठरवून दिलेल्या कालावधीत जमा करण्यात आलेल्या सर्व अर्जांची पडताळणी करून त्यातून पात्र उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल. अर्जदाराला जर डेटा एन्ट्री ऑपरेटर कामाचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. एक्झेक्युटिव्ह असिस्टंट या पदी नेमणूक झाल्यानंतर त्या उमेदवाराला दर महिना २२,०००/- वेतन दिले जाईल.

अर्जदाराने वेळेत अर्ज करण्यासोबतच सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेला अर्ज भरणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेला अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. या भरती विषयीची सविस्तर माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

Leave a Comment