BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भरती जाहीर !

BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भरती जाहीर !

BMC Recruitment 2024 :

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू आहे. ही भरती एकूण २६ हून अधिक रिक्त जागांसाठी सुरू आहे. या रिक्त जागा रजिस्ट्रार आणि हाऊस ऑफिसर या पदांसाठी आहेत. या पदांसाठी महिला आणि पुरुष हे दोघेही अर्ज करू शकतात. वेळेवर अर्ज भरून, पुढे यशस्वीरित्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उमेदवार निवडून आल्यास त्यांना दर महिना ७६,०००/- होऊनही अधिक वेतन मिळणार.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण २६ पदांसाठी भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेत महिला आणि पुरुष हे दोघेही सहभागी होऊ. महानगरपालिकेतील ही भरती मुख्यतः रजिस्ट्रार आणि हाऊस ऑफिसर या दोन पदांसाठी आहे. २६ हून अधिक जागा भरण्यासाठी सुरू असलेल्या या भरतीत दिनांक १० जुलै २०२४ पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक १६ जुलै २०२४ पर्यंत सादर करणे अपेक्षित आहे.

रजिस्ट्रार आणि हाऊस ऑफिसर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ४१७/- इतके अर्ज शुल्क आकारण्यात येईल. या भरतीसाठी चा अर्ज हा उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्जदाराने त्यांचा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करणे अपेक्षित आहे. हा अर्ज जमा करण्यासाठी १६ जुलै २०२४ ही शेवटची तारीख असेल. त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अर्ज जमा करण्याचा पत्ता-  मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि H.O.D. (से. हेल्थ केअर सर्व्हिसेस), के.बी. भाभा हॉस्पिटल, वांद्रे (पश्चिम), आर.के. पाटकर मार्ग, मुंबई – ४०० ०५०

BMC Vacancy Salary: किती असेल दर महिन्याचा पगार* उमेदवाराची रजिस्ट्रार पदासाठी निवड झाल्यास त्याला दर महिना ७६,८४८/- इतके वेतन असेल.
* उमेदवाराची हाऊस ऑफिसर पदासाठी निवड झाल्यास त्याला दर महिना ७६,१०४/- इतके वेतन असेल.

 

Leave a Comment