BMC मध्ये Lab Technician च्या पदासाठी नोकरीची संधी !

BMC मध्ये Lab Technician च्या पदासाठी नोकरीची संधी !

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाच्या रिक्त असलेल्या ७ जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी 12 ऑगस्ट 2024 च्या आधी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. १४ ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या मुलाखत फेरीतून पात्र उमेदवारांची त्या पदावर नियुक्ती करण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण सात जागा भरण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या सातही जागा लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणजेच प्रयोगाच्या तंत्रज्ञ या पदाच्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून रुजू होण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने त्यांचा अर्ज सादर करू शकतात. या पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी दिनांक ५ ऑगस्ट २०२४ पासून सुरुवात झाली आहे तर दिनांक १२ ऑगस्ट२०२४ शेवटची तारीख नेमून देण्यात आली आहे.

ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता: वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय घाटकोपर, मुंबई- 400077.

दिनांक १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत सर्व उमेदवारांचे अर्ज जमा केले जातील. पुढे दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने पात्र उमेदवारांची निवड प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी केली जाईल.

उमेदवारांनी त्यांचा अर्ज सर्व कागदपत्रे/ प्रमाणपत्रे जोडून ठरवून दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत आणि म्हणजेच १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर केला नाही तर त्यांचा अर्ज या भरतीप्रक्रियेत ग्राह्य धरला जाणार नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर केली जाणारी नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने असेल. पात्र उमेदवार या पदावर सहा महिन्यांसाठी रुजू होईल. उमेदवाराची प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर नियुक्ती झाल्यावर त्याला दर महिना २०,०००/- वेतन दिले जाईल.

दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या मुलाखत फेरीसाठी सकाळी अकरा वाजता नियोजित स्थळी उपस्थित असणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी त्यांचा अर्ज आणि त्यासोबत जोडलेली सर्व प्रमाणपत्र/ कागदपत्रे यांच्या ओरिजनल प्रति सोबत बाळगणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील अधिक माहिती https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाचता येईल.

Leave a Comment