BMC Suraksha Rakshak Bharti 2022 – Vacancies of officers and security guards in the security forces of Mumbai Municipal Corporation will be filled soon. The Municipal Security Force and the training center at Bhandup will be modernized soon. According to Additional Commissioner Suresh Kakani, financial assistance is being provided to the families of the security personnel and jawans who died due to obstruction of Covid while fighting Covid.
BMC Suraksha Rakshak Bharti 2022
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलातील अधिकारी, सुरक्षा रक्षकांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. पालिका सुरक्षादलाचे व भांडुप येथील प्रशिक्षण केंद्राचे लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. कोविडचा मुकाबला करताना कोविड बाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा दलातील अधिकारी, जवान यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येत असून त्यांच्या वारसांना पालिका सेवेत नोकऱ्याही देण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे(The vacancies of officers and security guards in the security forces of Mumbai Municipal Corporation will be filled soon).
मुंबई महापालिका सुरक्षा दलाचा ५६ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण समारंभ भांडुप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात आज संपन्न झाला. याप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश काकाणी होते. .
कोविड काळात पालिका सुरक्षादल, अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभाग यांनी उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी जवानांचे कौतुक केले. त्यामुळे यापुढेही पालिका सुरक्षादल खाते, अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभाग यांनी समन्वय साधून एकत्रितपणे कोणत्याही संकटाचा मुकाबला करावा, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यावेळी केले.
प्रशिक्षण केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी ५ कोटी
भांडुप संकुल येथील सुरक्षादलाच्या प्रशिक्षण केंद्राचे ५ कोटी रुपये खर्चून लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
जीवित हानी टळली
कोविड काळात पालिकेच्या कोविड सेंटरला एकदा आग लागलेली असताना अग्निशमन दल व सुरक्षादलामुळे एकत्रित बचावकार्य केल्याने वित्तीय व मोठी जीवित हानी टळली, अशी माहिती उपायुक्त प्रभात रहांगदले यांनी दिली.