मुंबई उच्च न्यायालयात मॅरेज काउन्सिलरची भरती सुरू आहे !
Bombay High Court Recruitment 2024 :
मुंबई उच्च न्यायालयात विवाह समुपदेशक पदासाठी भरती सुरू आहे. उमेदवार या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. पदवीधर असलेले उमेदवार विवाह समुपदेशक या पदासाठी अर्ज करू शकतात. विवाह समुपदेशक पदाच्या एकूण ३१ जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी १ ऑगस्ट २०२४ पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा
मुंबई उच्च न्यायालयात विवाह समुपदेशक पदासाठी भरती सुरू आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असेल. ३ जुलै २०२४ पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल इच्छुक उमेदवार विवाह समुपदेशक पदासाठी १ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. पदवीधर असलेली कोणतीही व्यक्ती या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे. मुंबई उच्च न्यायालयात विवाह समुपदेशक पदासाठी एकूण ३१ रिक्त जागा आहेत. या पदासाठी अर्ज केल्यानंतर मुलाखतीच्या माध्यमातून पडताळणी करून पुढे जॉब साठी निवड करण्यात येईल.
मुंबई उच्च न्यायालयात विवाह समुपदेशक या पदासाठी पात्र होण्यासाठीच्या वयोमर्यादेच्या अटी पुढीलप्रमाणे-Bombay High court Job Vacancy:
Marriage Counsellor
वयोमर्यादा:
खुला वर्ग – ४० वर्षे
एससी किंवा एसटी वर्ग – ४० + ५ वर्षे
ओबीसी वर्ग – ४० + ३ वर्षे
वेतन : मुंबई उच्च न्यायालयात विवाह समुपदेशक म्हणून रुजू झाल्यावर ५६,१००/- ते १,७७,५००/-इतके वेतन असेल.
मुंबई उच्च न्यायालयातील विवाह समुपदेशक या पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला खालील पायऱ्या मदतीच्या ठरतील:
- सगळ्यात आधी तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाच्या bombayhighcourt.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
- तिथे दिसणाऱ्या होम पेज वरील मॅरेज काऊन्सिलर वेकेन्सी या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- हे केल्यानंतर तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसणाऱ्या सर्व सूचना लक्षपूर्वक वाचणे फार महत्त्वाचे आहेत.
- पदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेच्या निकषांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला तेथे उपलब्ध असलेल्या अर्जाच्या बटणावर क्लिक करायचे आहे.
- पुढे तुम्हाला अचूक पद्धतीने तो अर्ज भरायचा आहे, अर्ज भरतेवेळी विचारण्यात आलेली सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
- अर्ज भरून झाल्यावर अर्ज करण्यासाठी फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
- अर्ज जमा करायच्या आधी संपूर्ण तपासणे फार गरजेचे आहे. त्यानंतरच उमेदवाराने सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे
तुम्हाला हा अर्ज डाऊनलोडही करता येईल किंवा तुम्हाला याची छाया प्रत देखील काढता येईल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या bombayhighcourt.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला अधिक माहिती मिळेल.