CAPFs सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्सेस मध्ये नोकरीची संधी !

सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्सेस मध्ये नोकरीची संधी !

CAPFs  Recruitment 2024 :

सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्सेस ( CAPFs) मध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF), पर्सोनेल डायरेक्टोरेट : रिक्रूटमेंट सेक्शनमार्फत पुढील पदांची थेट भरती.

(अ) ‘असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर)’ आणि ‘वॉरंट ऑफिसर’

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ( BSF) (पुरुष/ महिला) एकूण १७ पदे (अजा २, अज ११, ईडब्ल्यूएस २, खुला २).

सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ( CRPF) (पुरुष/ महिला) एकूण २१ पदे (अजा ३, अज २, इमाव ६, ईडब्ल्यूएस २ खुला ८).

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस ( ITBP) (पुरुष) एकूण ४८ पदे (अजा ६. अन ४, इमाव १४, ईडब्ल्यूएस ५, खुला १९). (महिला) एकूण ८ पदे (अजा १, अज १, इमाव २, ईडब्ल्यूएस १, खुला ३).

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) (पुरुष) एकूण १३६ पदे (अजा २९, अज१५, इमाव ४७, ईडब्ल्यूएस८, खुला ३७). (महिला) एकूण १० पदे (अजा १, इमाव २, ईडब्ल्यूएस १, खुला ६).
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) (पुरुष) एकूण १३६ पदे (अजा २९, अज१५, इमाव ४७, ईडब्ल्यूएस८, खुला ३७). (महिला) एकूण १० पदे (अजा १, इमाव २, ईडब्ल्यूएस १, खुला ६).

सशस्त्र सीमा बल (SSB) (पुरुष/ महिला) एकूण ३ पदे (इमाव १, खुला २),

(ब ) ‘हेड कॉस्टेबल (मिनिस्ट्रीयल कॉम्बैटंट मिनिस्ट्रीयल)’ आणि ‘हवालदार (क्लर्क)’

(BSF) (पुरुष/ महिला) एकूण ३०२ पदे (अजा ४७, अज ५६, इमाव ९९ ईडब्ल्यूएस २०, खुला ८०).

(CRPF) (पुरुष/ महिला) एकूण २८२ पदे (अजा ४१, अज ३१, इमाव ७३. ईडब्ल्यूएस २७, खुला ११०).
(ITBP) (पुरुष) एकूण १३८ पदे (अजा २६, अज ६, इमाव १९. ईडब्ल्यूएस ९ खुला ७८). (महिला) एकूण २५ पदे (अजा ५, अज १, इमाव ३, ईडब्ल्यूएस २, खुला १४).

(CISF) (पुरुष) एकूण ४४६ पदे (अजा ६७, अज ३३, इमाव १२० ईडब्ल्यूएस ४४ खुला १८२), (महिला) एकूण ५० पदे (अजा ७, अज, इमाव १३ ईडब्ल्यूएस ५ खुला २२).

(SSB) (पुरुष/महिला) एकूण ५ पदे (अजा १, अज १, खुला ३)

आसाम रायफल्स (AR) (पुरुष/ महिला) एकूण ३५ पदे (अजा ५, अज २, इमाव ९, ईडब्ल्यूएस ३, खुला १६).

रिक्त पदांच्या १० टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.

वयोमर्यादा : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) १८-२५ वर्षे. (कमाल वयोमर्यादा सूट इमाव ३ वर्षे: अजा/अन ५ वर्षे) (पुनर्विवाह न केलेल्या विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त महिला खुला/ इमाव ईडब्ल्यूएस ३५ वर्षे, अना/अज ४० वर्षे) पात्रता (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) १२ वी उत्तीर्ण.

निवड पद्धती : फेज-१ शारीरिक मापदंड चाचणी (PST) आणि शारीरिक क्षमता चाचणी (PET) (फक्त पात्रता स्वरूपाची) फेज-२- कॉम्प्युटर बेसड टेस्ट

फेज-३- स्किल टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि वैद्याकीय तपासणी (DME/ RME)

शारीरिक मापदंड चाचणी (PST) : पुरुष उंची १६५ से.मी. (अनुसूचित जमाती १६२.५ से.मी.), खाती ७७-८२ सें.मी. (अज ७६-८२ सें.मी.); चष्म्याशिवाय दृष्टी जवळची दृष्टी N/६ N/९: दूरची दृष्टी ६/६,
६/९. महिला उंची १५५ सें.मी. (अब १५० से.मी.)

शारीरिक क्षमता चाचणी (PET) : पुरुष १.६ कि.मी. अंतर ६ मि. ३० सेकंदांत धावणे, महिला ८०० मीटर ४ मि. ४५ सेकंदांत धावणे, माजी सैनिकांना PET द्यावी लागणार नाही.

फेज-२- कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) : PST, PET मधून पात्र उरलेल्या उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे १०० प्रश्न, १०० गुण, वेळ १ तास ४० मिनिटे. (ए) हिंदी किंवा इंग्लिशलैंग्वेज, (बी) जनरल इंटेलिजन्स, (सी) न्यूमरिकल अॅप्टट्यूड, (डी) क्लेरिकल अॅप्टिट्यूड, (३) कॉम्प्युटर नॉलेज प्रत्येकी २० प्रश्न, २० गुण, परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल.

CBT साठीचे केंद्र आणि तारीख उमेदवारांना ई-अॅडमिट कार्ड एसएमएस, ई-मेल द्वारे कळविली जाईल. (BSF वेबसाईटवरून ई-अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.) CBT चा सराव करण्यासाठी उमेदवारांना BSF च्या वेबसाईटवर Mock Test Link उपलब्ध करून दिली जाईल.

उमेदवारांचे CBT मध्ये मिळालेले गुण नॉर्मलाईज्ड केले जातील आणि असे नॉर्मलाईज्ड गुण अंतिम
गुणवत्ता यादी आणि कट ऑफसाठी विचारात घेतले जातील.

CBT मधील मिळालेल्या गुणांबद्दल (प्रश्न आणि उत्तरतालिका (Answer Keys)) काही आक्षेप असल्यास उमेदवारांना Objection Management Link BSF वेबसाईटवर CBT परीक्षेनंतर २-३ दिवसांत उपलब्ध करून दिली जाईल.

फेज-३ ASI च्या रिक्त पदांच्या ३० पट आणि हेड कांस्टेबलच्या रिक्त पदांच्या १० पट उमेदवार फेज-३ साठी निवडले जातील.

स्किल टेस्टचे निकष :

ASI (स्टेनो/कॉम्बैटंट स्टेनो) डिक्टेशन १० मिनिटांसाठी ८० श.प्र.मि. वेगाने कॉम्प्युटरवर ट्रान्सक्रिप्शनसाठी इंग्लिश ५० मिनिटे किंवा हिंदी ८५ मिनिटे वेळ दिला जाईल.

हेड कॉस्टेबल (मिनिस्ट्रीयल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रीयल), हवालदार (क्लर्क) १० मिनिटांसाठी कॉम्प्युटरवर टायपिंग इंग्लिश – ३५ श.प्र.मि. (१०,५०० KDPH) किंवा हिंदी ३० श.प्र.मि. (९,००० KDPH).

हिंदीसाठी स्किल टेस्ट MANGAL FONT वर घेतली जाईल.

कागदपत्र पडताळणी : PST, PET, CBT, स्किल टेस्टमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना मूळ प्रमाणपत्र आणि स्वयंसाक्षांकीत केलेल्या त्यांच्या प्रती कागदपत्र पडताळणीसाठी सादर कराव्या लागतील. (सोबत ३ रंगीत फोटोग्राफ्स आणि ओरिजिनल आयडी प्रूफ आणावे लागेल.)

वैद्याकीय तपासणी : शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची वैद्याकीय तपासणी (डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन ( DME)) केली जाईल. DME मधून अपात्र ठरलेले उमेदवार रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन ( RME) साठी Annexure- VIII मध्ये निवेदन देऊ शकतील.

अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता न आल्यास शंकासमाधानासाठी BSF हेल्पलाईन नंबर ०११-२४३६४८५१/ ५२/ ५३/ ५४/ ५५ वर संपर्क साधा. (१०.०० ते १८.०० वाजे दरम्यान कामकाजाच्या दिवशी)

अंतिम निवड CBT मधील कामगिरीवर आधारित केली जाईल.

उमेदवार PST/ PET साठीचे परीक्षा केंद्र नागपूर, बेंगलुरू, हैदराबाद इ. देशभरातील ४० BSF सेंटर्सपैकी एक निवडू शकतात.

अर्जाचे शुल्क : रु. १००/-. ऑनलाइन मोडने भरावयाचे आहे. (अजा/ अज/ माजी सैनिक/ महिला यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज BSF वेबसाईट https:// rectt. bsf. gov. in वर दि. ८ जुलै २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

Leave a Comment

9163