जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रिया मार्गदर्शनासाठी 9 मार्च रोजी वेबिनारचे आयोजन
Caste Validity Webinar 2021 – To provide guidance on how to fill up the application and what documents to attach, documents and evidence required to prove the caste claim, An online webinar has been organized on 9th March 2021 through Zoom App
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी दि. 9 मार्च 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता Zoom अॅपद्वारे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत. तसेच ज्यांना पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती. इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गातून प्रवेश घेणेसाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यक असते. परंतु अनेक विद्यार्थी व पालकांना वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा, कधी करावा याबाबत माहिती नसते. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळी त्यांचीं गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्याचप्रमाणे जे अधिकारी/कर्मचारी शासकीय नोकरीत आहेत त्यांचेसाठीसुध्दा जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
जात वैधता प्रमाणपत्राचे सुलभीकरण व्हावे व अर्जदारांना लवकरात लवकर वैधता प्रमाणपत्र मिळावे व कामकाजात पारदर्शकता यावी या करिता शासनाने ऑगस्ट, 2020 पासून ऑनलाईन सुविधा सुरु केलेली आहे. परंतु बरेच अर्जदारांना ऑनलाईन प्रक्रियेबाबत माहिती नाही. याकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी दि. 9 मार्च, 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता Zoom अॅपद्वारे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केलेले आहे.
Zoom Meeting लिंक खालील प्रमाणे आहे.
Topic: Caste Certificate Verification and other helping aspects Time: Mar 9, 2021 03:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi
Join Zoom Meeting
https://us04web.zoom us/8027832431/PLEwNFp.WWXHeFRpclipvN2UVkOdz09
Meeting ID: 802 783 2431
Passcode: caste 123
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे 25 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन
Caste Validity Barti Webinar 2021 – Applicants are still unaware of the validity certificate verification process. Applicants face difficulties in filling up the application .To provide guidance on how to fill up the application and what documents to attach, documents and evidence required to prove the caste claim, An online webinar has been organized on February 25, 2021. Read further information about Caste Validity Barti Webinar 2021 at below
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाइन वेबिनारचे दि. 25 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.
Caste Validity Online Application Form
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, सेवा, निवडणूक व इतर कारणाकरीता वैधता प्रमाणपत्रासंदर्भात अर्जदारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज दि.01 ऑगस्ट, 2020 पासून स्वीकारण्यात येत आहेत, अर्जनिहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील (Payment Gateway द्वारे) उपलब्ध करण्यात आलेली आहे.
अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी -www. barti.mah.gov.in Caste Validity 2021
बरेच अर्जदार अद्याप वैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत. अर्जदारांना अर्ज भरताना पुढीलप्रमाणे अडचणी येतात उदा. कोणत्या प्रकारे अर्ज भरावा व कोणते दस्तऐवज जोडावे, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे स्तरावर गुरुवार दि. 25फेब्रुवारी, 2021 रोजी ऑनलाईन वेबिनारचे (Webinar) आयोजन करण्यात आले आहे.
ऑनलाईन वेबिनारचा (Webinar) लाभ घ्यावा
तरी सर्व अर्जदार, पालक व विद्यार्थी यांनी या ऑनलाईन वेबिनारचा (Webinar) लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents