CBSE Exam 2021

CBSE 2021-2022 शैक्षणिक सत्रासाठी नवीन अभ्यासक्रम जाहीर

CBSE Exam 2021 – The Central Board of Secondary Education (CBSE) has released a new syllabus for the academic session 2021-2022. The board has released the new syllabus for class 9th, 10th, 11th and 12th on the official website . According to the syllabus released on the official website, CBSE has not reduced the syllabus for the academic session 2021-22. This means that the students will have to study the entire 100 percent syllabus and the exam will be conducted on the basis of this only. Students should pay special attention to this.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शैक्षणिक सत्रासाठी नवीन अभ्यासक्रम 2021-2022 जाहीर केला आहे. मंडळाने इयत्ता 9 वी, 10, 11 व 12 वी साठी नवीन अभ्यासक्रम अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे. अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या अभ्यासक्रमानुसार सीबीएसईने शैक्षणिक सत्र 2021-22 चा अभ्यासक्रम कमी केलेला नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांना संपूर्ण 100 टक्के अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा लागणार आहे आणि परीक्षा फक्त याच आधारावर घेण्यात येईल.

Direct Link To Check CBSE New Syllabus 2021


CBSE Exam 2021 – The Central Board of Secondary Education (CBSE) is all set to release the official CBSE Time Table 2021 for Class 10 and 12 board exams 2021 Today . Candidates who are preparing for the examination must note that the exam will be held in the offline mode from May 4 to June 10. After the formal announcement of CBSE Class 10 and CBSE Class 12 Timetables, the same will be available on the official website of the board i.e. cbse.nic.in.

 CBSE Exam DateSheet 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी या तारखांची घोषणा केली. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत. वेळापत्रकानुसार या परीक्षा १० जून २०२१ पर्यंत सुरू राहणार आहेत.

पोखरियाल म्हणाले, ‘दोन पेपरच्या मध्ये अंतर ठेवण्यात आले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त पद्धतीने परीक्षा देता येतील.’ प्रतिकूल परिस्थितीत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोखरियाल यांनी कौतुक केले. शिक्षकांनीही कोविड योद्ध्याप्रमाणे काम केले असे सांगत त्यांनी त्यांच्या कामाप्रति आभार मानले.

विद्यार्थ्यांनी परीक्षांची नीट तयारी करावी असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

सीबीएसई बोर्डाची परीक्षा २०२१ चे वेळापत्रक आज २ फेब्रुवारी, २०२१ रोजी जाहीर केले जाईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षेची तारीख पत्रिका अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. जाहीर झाल्यावर विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावर cbse.gov.in वर तारीख पत्रक तपासू शकतील. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी यापूर्वी सीबीएसईच्या वेळ सारणीच्या तारखेची पुष्टी केली होती.

विद्यार्थ्यांच्या या  स्टेप्स च्या माध्यमातून  तारखेची तपासणी करू शकतात 

1: अधिकृत वेबसाइट- cbse.nic.in वर भेट द्या
2: ‘वर्ग 10, 12 तारखे’ दुव्यावर क्लिक करा
3: दहावी / 12 च्या परीक्षेचे वेळापत्रक स्क्रीनवर दिसून येईल
4: डाउनलोड करा, पुढील संदर्भासाठी एक मुद्रण घ्या.


CBSE Exam 2021– After a long wait, the CBSE board exam dates were finally announced. The Education Minister informed in a session that the board exams will start from May 4 and will continue till June 10, 2021.

बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अखेर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. शिक्षणमंत्र्यांनी एका सत्रात माहिती दिली की बोर्डाच्या परीक्षा 4 मेपासून सुरू होतील आणि 10 जून 2021 पर्यंत चालतील. परीक्षेचा निकाल जुलैमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय मार्चमध्ये प्रॅक्टिकल परीक्षादेखील घेतल्या जातील.

शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार या परीक्षा 4 मेपासून सुरू होतील आणि 10 जून 2021 पर्यंत चालतील. 15 जुलै रोजी निकाल जाहीर होईल.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोखरियाल यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. विद्यार्थ्यांना आता पुरेसा वेळ मिळाला असल्याने त्यांनी निश्चिंत मनाने आणि पूर्ण क्षमतेने परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पूर्वी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन त्या मार्चपर्यंत संपायच्या. मात्र २०२० मध्ये करोना परिणामामुळे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले परिणामी परीक्षाही थोड्या विलंबाने होणार आहेत.

दरम्यान, देशाने नव्या शिक्षण धोरण २०२० ला उत्सवी रुपात स्वीकारले आहे, असेही पोखरियाल म्हणाले.


CBSE Exam 2021 – Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank is interacting with teachers across the country. CBSE Exam 2021 and JEE Main Exams are interacting on issues. Ramesh Pokhriyal has announced that 10th and 12th CBSE board exams will not be held till February 2021. Read below details on CBSE Exam 2021

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक देशातील शिक्षकांशी संवाद साधत आहेत. सीबीएसई परीक्षा 2021 आणि जेईई मेन परीक्षांविषयीच्या अडचणींबाबत संवाद साधत आहेत. 10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल यांनी केली. आतापर्यंत 4 लाख 80 हजार शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली. (Ramesh Pokhriyal said no CBSE board exam till February 2021)

सीबीएसीई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीनंतर

परीक्षा रद्द करणे आणि विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करणं हा विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणीचे आणणार ठरेल. नोकरी आणि प्रवेश मिळवताना पुढील काळात अडचणी निर्माण होऊ शकताता. त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द न करता पुढे ढकलल्या जातील. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षा फेब्रुवारीनंतर होतील, असं रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले.

क्लासेस ऑनलाईन मग परीक्षा का नको?

रमेश पोखरियाल निशंक यांनी काही विद्यार्थ्यांना अजून समान संधी मिळत नाही. सध्या आपण ऑनलाईन क्लासेस घेत आहोत. मात्र, सध्याच्या परीक्षेत ऑनलाईन परीक्षा घेणे अशक्य आहे, असं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सांगतिले. क्लासेस ऑनलाईन होत आहेत तर परीक्षा ऑनलाईन का व्हायला नकोत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. Ramesh Pokhriyal said no CBSE board exam till February 2021)

30 टक्के अभ्यासक्रम कमी केला

सीबीएसई परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. जेईई मेन 2021 परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसमोर अधिक पर्याय उपलब्ध असतील, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 90 प्रश्नांच्या दोन विभागातील फक्त 75 प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने लागू केलेले नवे शैक्षणिक धोरण लागू करताना शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, असंही पोखरियाल म्हणाले. व्यावसायिक शिक्षण आणि आंतरवासियता 6 वीच्या वर्गापासून सुरु करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले.

शिक्षक कोरोना वॉरिअर्स

कोरोना विषाणूमुळे अनेक देशांनी संपूर्ण शैक्षणिक वर्ष रद्द केले. मात्र, आपल्या देशातील शिक्षकांनी सातत्यानं काम केले. त्यांनी कोरोना काळात एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. शिक्षकांनी कोरोना योद्ध्यांसारखे काम करुन 33 कोटी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले, असं पोखरियाल म्हणाले.

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..