CDAC Pune येथे मोठी भरती सुरु ;असा करा अर्ज !
CDAC Pune Recruitment 2024 :
नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक लोकांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक भरती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता प्रगत संगणक विकास केंद्र पुणे (CDAC Pune Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. ही भरती प्रकल्प संयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, मॉड्युल लीड प्रमख प्रकल्प प्रमुख या पदांसाठी आहेत.
या पदांच्या एकूण 250 रिक्त जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथे अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 16 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी यासारखे अगोदरच अर्ज करा अन्यथा तुमच्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
- पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रकल्प प्रमुख
- पदसंख्या – 250जागा
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2024
No. of Posts रिक्त पदांची संख्या :
- प्रकल्प सहयोगी – 42
- प्रकल्प अभियंता – 85
- प्रकल्प व्यवस्थापक – 20
- प्रकल्प अधिकारी – 03
- प्रकल्प सहाय्यक कर्मचारी – 05
- वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रकल्प प्रमुख – 95
How to Apply अर्ज कसा करावा ?
- त्या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
- यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
- Website link वेबसाइट लिंक https://careers.cdac.in/advt-details/PN-1972024-TYT1X
- 16 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेअगोदर अर्ज करा.
- अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.