‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!
Central Bank of India Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या अहमदनगर येथील शाखेत व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदाच्या दोन जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत नवीन उमेदवारांसह सेवानिवृत्त बँक कर्मचारी देखील सहभाग घेऊ शकतात. या भरतीतील अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार दिनांक १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत त्यांचा अर्ज सादर करू शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे. ही भरती बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझर म्हणजेच व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदासाठी जाहीर करण्यात आली आहे. या पदाच्या दोन जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अहमदनगर येथील शाखेत आहेत. या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज दिनांक १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करू शकतात.
अर्ज प्रक्रिया कशी करावी?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या अहमदनगर येथील शाखेतील व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक या पदाची दोन पदे रिक्त आहेत. यासाठीची अर्ज प्रक्रिया दिनांक ८ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली असून ती दिनांक १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत सुरू राहील. इच्छुक उमेदवारांनी दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता:
प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, प्लॉट क्रमांक ५६, सह्याद्री चौक, एमआयडीसी नागपूर, अहमदनगर – 414111
शैक्षणिक पात्रता-
- नवीन उमेदवार
- उमेदवार पदवीधर असणे आवश्यक
- संगणकीय ज्ञान असणे आवश्यक
- M.Sc. (IT)/B.E.(IT)/MCA/MBA हे अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- सेवानिवृत्त बँक कर्मचारी
- कोणत्याही बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी या पदासाठी अर्ज करू शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरतीतून बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझर या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्या उमेदवारासाठी अहमदनगर हे नोकरीचे ठिकाण असेल. सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या अहमदनगर येथील शाखेसाठी सुरू असलेल्या या भरती बद्दलची अधिक माहिती, तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू असलेल्या इतर पदांच्या भरती संदर्भातील अधिक सविस्तर माहिती त्यांच्या या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येईल.