Advertisement

Chandrapur DCC Bank Bharti 2022

बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! चंद्रपूर DCC बँकेत 165 पदांसाठी भरती लवकरच

Chandrapur DCC Bank Bharti 2022 -Dhanorkar has been given 165 posts in Chandrapur District Bank by the Co-operation Minister. On the other hand, a high-level committee should be appointed to probe the Chandrapur District Bank, she said. Pratibha Dhanorkar has demanded the Thackeray government to remove the charge from the CEOs who have the current charge of the bank. It remains to be seen what decision the state government will take on the demand of Pratibha Dhanorkar.

Chandrapur DCC Bank Bharti 2022

चंद्रपूरमधील (Chandrapur) वरोरा भद्रावतीच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Chandrapur DCC Bank) कारभारासंदर्भात विधानसभेत विविध प्रश्न मांडले आहेत. धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा बँकेत 165 पदांची भरती करण्यास सहकार मंत्र्यांनी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर, दुसरीकडे चंद्रपूर जिल्हा बँकेची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात यावी, असं देखील त्या म्हणाले आहेत. चंद्रपूर जिल्हा बँक भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली असल्याचं देखील प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत मांडलं. जिल्हा बँकेतील गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केलीय. बँकेचा सध्याचा चार्ज ज्यांच्याकडे आहे त्या सीईओंकडून तो चार्ज काढून घ्यावा, अशी मागणी प्रतिभा धानोरकर यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

CDCC Bank Chandrapur Recruitment 2022

प्रतिभा धानोरकर काय म्हणाल्या?

चंद्रपूर जिल्हा बँक भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतलेली आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सन २०१२ ते २०१७ पर्यंत होता. सुप्रीम कोर्टानं प्रशासक नेमण्याचे आदेश दिले. मात्र, अद्याप प्रशासक नेमण्यात आलेला नाही. राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला 165 पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे.

यापूर्वीच्या दोन नोकर भरती वादग्रस्त

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थापक यांच्यावर फसवणुकीच्या दोन प्रकरणात 420 चे गुन्हे असून देखील त्यांना बढती देण्यात आली असल्याची बाब प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली आहे. याआधीच्या दोन नोकर भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सन 2012 ते 2017 पर्यंत होता. परंतु, आता पर्यंत संचालक मंडळ बरखास्त झाले नाही. त्याउलट दोन वेगवेगळ्या प्रकरणात 420 कलमाचा आरोपाचा गुन्हा दाखल होऊन देखील मुख्य व्यवस्थापक ती व्यक्ती पदावर कार्यरत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ चौकशी समिती गठीत करून प्रशासक नेमावा अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत केली.

Leave a Comment