Advertisement

COAL INDIA अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती सुरु

COAL INDIA अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती सुरु

Coal India Bharti 2024 : कोल इंडिया लिमिटेडने ‘वैद्यकीय कार्यकारी’ यांच्या विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत.
कोल इंडिया लिमिटेडने ‘वैद्यकीय कार्यकारी’ (Medical Executive) यांच्या विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आज १२ मार्चपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार http://www.easterncoal.nic.in या वेबसाइटवर लॉग इन करून, त्यांचा अर्ज ऑनलाइन जमा करू शकतात.

भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, वयोमर्यादा, अर्ज कसा करावा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

रिक्त पदे आणि पदसंख्या – कोल इंडियामध्ये ही भरती वैद्यकीय कार्यकारी पदाच्या ३४ रिक्त जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

वयोमर्यादा – जनरल / यूआर वरिष्ठ मेडिकल स्पेशालिस्ट (E4 ग्रेड)साठी उमेदवारांचे वय ४२ वर्षे असावे. तर वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणजेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंत) किंवा वैद्यकीय तज्ज्ञासाठी जनरल/ यूआरसाठी उमेदवाराचे वय ३५ वर्षे असावे.

अर्ज कसा करावा?

उमेदवार आज १२ मार्चपासून http://www.easterncoal.nic.in या वेबसाइटवर लॉग इन करून त्यांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने जमा करू शकतात. अर्ज जमा केल्यानंतर उमेदवाराला अर्जाची प्रिंटआउट आणि प्रशस्तिपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रतीसह (चेकलिस्टनुसार) स्पीड पोस्टद्वारे GM/HoD (कार्यकारी आस्थापना विभाग), सँक्टोरिया, दिशेरगड, पश्चिम बर्धमान, पश्चिम बंगाल-७१३३३३ या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.

पगार –
१. (a) वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ E-4 = ७०,००० ते २,००,००० रुपये

(b) वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ E-3 =६०,००० ते १,८०,००० रुपये

२. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी E-3 = ६०,००० ते १,८०,००० रुपये.

३. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंत) E-3 = ६०,००० ते १,८०,००० रुपये.

तर अशा प्रकारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

 

Leave a Comment