CTET Answer Key 2024 CBSE कडून CTET ची कडून उत्तरतालिका प्रसिद्ध, या लिंक वरून करा डाउनलोड
CTET Answer Key 2024 :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ७ जुलैला घेण्यात आली होती. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) ने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2024 ची तात्पुरती उत्तरतालिका (CTET Answer key) प्रसिद्ध केली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन उत्तरपत्रिका तपासू शकतात तसेच ती डाउनलोडही करू शकतात. यासह, उमेदवार आता CTET 2024 च्या उत्तरावर आक्षेप नोंदवू शकतात. आक्षेप नोंदविण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे प्रति प्रश्नाचे शुल्क भरावे लागणार आहे.
परीक्षार्थींना उत्तरे तपासायची असतील तर https://cbseit.in/cbse/2024/ctetkey2/ या लिंकवर क्लिक करून पाहता येईल. CTET 2024 ची उत्तर की थेट तपासू शकतात. खाली दिलेल्या या पायऱ्यांद्वारे तुम्ही उत्तर की देखील डाउनलोड करू शकता. जर आव्हान मंडळाने स्वीकारले असेल, म्हणजे ऍन्सर की मध्ये कोणतीही चूक विषय तज्ञांच्या लक्षात आल्यास, धोरणात्मक निर्णय सूचित केला जाईल आणि शुल्क परत केले जाईल. परतावा संबंधित क्रेडिट/डेबिट कार्ड खात्यात ऑनलाइन हस्तांतरित केला जाईल. त्यामुळे उमेदवारांना त्यांच्या स्वत:च्या क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पेमेंट करण्याचा सल्ला दिला जातो. आव्हानांबाबत मंडळाचा निर्णय अंतिम असेल आणि पुढे कोणताही संवाद साधला जाणार नाही, असंही परीक्षा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
CTET Answer Key 2024 ‘अशी’ डाउनलोड करा–
- CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावरील CTET 2024 उत्तर कीच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमची क्रेडेन्शियल एंटर करा आणि रोल नंबर आणि जन्मतारीख टाका.
- तात्पुरती उत्तर की स्क्रीनवर दिसेल.
- उत्तर की डाउनलोड करा
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents