ECHS ईसीएचएसअंतर्गत ८वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी !
ECHS Recruitment 2024 :
तुम्ही आठवी पास असाल आणि सरकी नोकरीच्या शोधात असाल तर हि संधी वाया जाऊ देऊ नका. माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस अंतर्गत ८ वी पास, १० वी पास, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या जागांसाठी १५ जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना म्हणजेच ईसीएचएस अंतर्गत ८ वी पास, १० वी पास, १२ वी पास आणि पदवीधर उमेदवारांची रिक्त पदांवर नियुक्त करण्यासाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून सफाई कर्मचारी, चौकीदार, नर्सिंग असिस्टंट, वैद्यकीय अधिकारी ही आणि यांसारखी इतर पदे भरली जाणार आहेत. तरी, पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात-लवकर आपले अर्ज सादर करून संधीचे सोने करावे.
Ex-Servicemen Contributory Health Scheme (ECHS) भरतीची जाहिरात भारत सरकार, संरक्षण भूतपूर्व सैनिक योगदान मंत्रालय, आरोग्य योजना मुख्यालय यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. तरी या भरती अंतर्गत अर्ज करून सरकारी नोकरीची मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्यांची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत असणाऱ्या विभागात काम करण्याची ही संधी असणार आहे.
ECHS Recruitment 2024:एकूण रिक्त पदे: १० जागा
शैक्षणिक पात्रता-ECHS Bharti 2024:
उपरोक्त भरती ८ वी, १० वी, १२ वी उत्तीर्ण व पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी आहे. अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची पद्धती-
ECHS Application Details 2024: सदर ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून थेट मुलाखतीच्या (Interview) माध्यमातून
- उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर निवड होणाऱ्या उमेदवारांना नाशिकमध्ये काम करावे लागणार आहे.
- मुलाखतीचा तपशील-ECHS 2024 Interview Information:
- उमेदवारांनी ईसीएचएस सेल, एसटीएन मुख्यालय, देवलाली येथे शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवांच्या समर्थनार्थ प्रशस्तिपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतीसह आवश्यक
- नमुन्यानुसार १५ जुलै २०२४ किंवा त्यापूर्वी जमा करायचा आहे.
- कोणताही अर्ज १५ जुलैनंतर प्राप्त झालेले स्वीकारले जाणार नाहीत.
या भरतीअंतर्गत ०१ आणि ०२ ऑगस्ट रोजी मुलाखत आयोजित केली जाईल.
या पत्त्यावर पाठवा अर्ज: ECHS सेल, Stn HQ, देवलाली
मुलाखतीचा पत्ता: स्टेशन मुख्यालय, देवलाली.