देशात अनेक यूजर्सना सोशल मीडिया वापरत असताना अडचणी येत आहेत. सोमवारी रात्री 8.30 नंतर Whatsapp, Facebook आणि Instagram या फेसबुक संचलित तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कनेक्टिव्हिटी अचानक गेली. Whatsapp down असल्याचं अधिकृतरीत्या अद्याप सांगण्यात आलेलं नसलं तरी जगभरात मोठ्या प्रमाणावर या मोबाइल अॅपला तांत्रिक अडचणींनी घेतलं होतं. तसंच भारतातल्या अनेक यूजर्सना facebook आणि instagram वापरतानाही अडचणी येत होत्या.
फेसबुकच्या ताब्यातल्या सगळ्याच सोशल मीडिया अॅप्सना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने यूजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी Facebook ने twitter ची मदत घेतली. Instagram आणि whatsapp सुद्धा बंद पडल्याने फेसबुकने ट्वीट करून याची दखल घेतली.
Facebook ची मालकी असलेल्या सगळ्या सोशल मीडिया साइट्सना भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे सोमवारी रात्रीपासून अडचणी येऊ लागल्या. Facebook, Instagram, Whatsapp बंद असल्याचे मेसेज ट्विटरवर (twitter trend)फिरत होते.