GMC Jalna येथे प्राध्यापक, सह-प्राध्यापक पदासाठी भरती !

GMC Jalna येथे प्राध्यापक, सह-प्राध्यापक पदासाठी भरती !

GMC Jalna Recruitment 2024 :

जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती सुरू झाली आहे. ही भरती प्राध्यापक पदाच्या १७ जागा आणि सहयोगी प्राध्यापक पदाच्या २७ जागा अशा एकूण ४४ जागांसाठी सुरू आहे.

जालना येथील जी एम सी म्हणजेच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज येथे भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या भरतीतून एकूण ४४ रिक्त जागा भरण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या भरतीत सहभागी होण्यासाठीअर्ज सादर करण्याची प्रक्रिया २९ जुलै २०२४ पासून सुरू होईल तर उमेदवार त्यांचा अर्ज ९ ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करू शकतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भरतीतील हे अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पार पडेल. नेमून दिलेल्या शेवटच्या तारखेनंतर जमा करण्यात आलेले अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता: अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थनगर जालना, पिन ४३१२१३.

जालना येथील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये रिक्त असलेली ही ४४ पदे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांची आहेत. ४४ पदांपैकी १७ पदे ही प्राध्यापक पदाची आहेत. तर इतर २७ पदे ही सहयोगी प्राध्यापक म्हणजेच असोसिएट प्रोफेसर या पदाची आहेत.

पात्रतेचे निकष-

या भरतीतील निवड प्रक्रिया करताना अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार गुण देण्यात येतील आणि या गुणांच्या आधारे पुढे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. हे गुण देतेवेळी पुढील मुद्दे लक्षात घेतले जातील.

  • पदव्युत्तर शिक्षण
  • पदवी शिक्षण आणि त्यातील टक्केवारी
  • बारावी उत्तीर्ण आणि त्यातील टक्केवारी
  • विशिष्ट विषयांमधील अधिकचे कोर्सेस
  • शिकवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. जितके अधिक वर्षांचा अनुभव तितके गुण जास्त.
  • उमेदवाराने सादर केलेल्या रिसर्च पेपर पब्लिश झालेला असणे आवश्यक. रिसर्च पेपर पब्लिश झाले असल्यास अधिक गुण.
  • मुलाखत फेरी

या सर्व गोष्टींच्या आधारे उमेदवारांना गुण दिले जातील व त्यातून अधिकाधिक गुण प्राप्त केलेल्या आणि सर्व अटींमध्ये बसणाऱ्या अशा पात्र उमेदवारांची नेमणूक त्या त्या पदांसाठी केली जाईल. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी सुरू असलेल्या या भरतीतून कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची नेमणूक करण्यात येईल. ही नेमणूक एक वर्षासाठी असेल. या भरती संदर्भात जाहीर होणाऱ्या सूचना आणि अधिक माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी https://jalna.gov.in/en/ या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment