Gramsevak Bharti 2022

ग्रामपंचायतीसाठी ८३ पदे मंजूर असून ग्रामसेवकांची तब्बल ३२ पदे रिक्त

Gramsevak Bharti 2022 – In rural areas, the Gram Panchayat is known as a democratic institution that has direct contact with the rural masses. Gramsevak is considered to be an important post in this Gram Panchayat. The Gram Sevak is also known as the Secretary of the Gram Panchayat. The various works in the Gram Panchayat are done through Gram Sevaks, so there is a Gram Sevak link between the citizens and the government. However, due to non-recruitment of Gram Sevaks in the state from 2018 and also due to delay in the transfer of Gram Sevaks due to Corona period, many posts of Gram Sevaks have become vacant. As a result, the administration of villages in rural areas has collapsed. Check latest Update on Gramsevak Bharti 2022, Gramsevak Recruitment 2022, Maharashtra Gramsevak Bharti 2022, Maha Gramsevak Vacancy 2022, Gramsevak Vacancy 2022  at below

ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असते. महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतीसाठी एकूण ८३ पदे मंजूर असून ग्रामसेवकांची तब्बल ३२ पदे रिक्त आहेत. ग्रामसेवकांअभावी ग्रामस्थांच्या कामाचा खोळंबा देखील होत आहे.

Gramsevak Recruitment 2022

ग्रामीण भागामध्ये ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी लोकशाही संस्था म्हणून ग्रामपंचायत ओळखली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हे महत्त्वाचे पद मानले जाते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून देखील ओळखले जाते. ग्रामपंचायतीमधील विविध कामे ग्रामसेवकांना मार्फत केली जात असतात, त्यामुळे नागरिक व सरकार यांच्यामधील ग्रामसेवक दुवा असतो. परंतु २०१८ पासून राज्यामध्ये ग्रामसेवकांची भरती न झाल्याने तसेच कोरोना काळामुळे ग्रामसेवकांच्या बदल्या देखील रखडल्याने ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त राहू लागली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गावांचा कारभार कोलमडला आहे.


अनेक जिल्ह्यात ग्रामसेवकांची पदे रिक्त

Gramsevak Bharti 2022– Gramsevak is the most Important Part of Grampanchayat. But this post is vacant in Grampanchayat. This should be filled as soon as possible. After 2018 Recruitment notification for Gramsevak Bharti has not been issued by Government. So it is expected that in this Year Gramsevak Bharti 2022 Process will start. Read More Information at below:

Gramsevak Recruitment 2022- जिल्हाभरात ग्रामपातळीवर प्रशासकीय कामकाज सांभाळणाºया ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे शेतकरी, ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. जिल्हाभरात अनेक  ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांची पदे रिक्त असून, ही पदे भरण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत येणाºया पाच उपबाजारांपैकी अनेक उपबाजारांची अवस्था वाईट आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने शेतमाल विक्रीस येणाºया शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्वांची व्यवस्थित नियोजन होण्यासाठी ग्रामसेवकांची मुबलक संख्या असणे आवश्यक आहे. या दृशीने लवकर पावले उचलत सरकारने भरती सुरु करावी हि मागणी सर्व जिल्ह्यातून होत आहे. 

ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पंचायतीच्या सर्व काराभारावर त्याचे नियंत्रण असते. ग्रामपंचायतमधील सर्वप्रकारचे अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे, विविध शासकीय योजना राबवणे, आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्ययावत ठेवणे, ग्रामसभा, मासिक सभा बो‍लविणे, त्यांच्या नोटिसा काढून संबंधितांना देणे, शासनाने व जिल्हा परषिदेने बसविलेले विविध कर वसूल करणे, ग्रामपंचायत हद्दीतील जमीन, रस्ते, इमारती, पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्ययावत ठेवणे, जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी करणे अशी अनेक कामे ग्रामसेवकांना करावी लागतात. ग्रामस्थांना लागणारे विविध दाखले देण्यापासून ते विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांना ग्रामसेवकावर अवलंबून राहावे लागते.

२०१८ नंतर ग्रामसेवक भरती झालेली नाही

नगर जिल्ह्यात एकूण १३१८ ग्रामपंचायती असून त्यातील ८५६ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक आहेत, तर ३ हजार लोकसंख्येच्या पुढील गावांसाठी २१६ ग्रामविकास अधिकारी नियुक्त आहेत. शिवाय १६ ग्रामसेवक कंत्राटी आहेत. तरी अजूनही २४६ गावांसाठी ग्रामसेवक नाहीत. त्यामुळे एकाच ग्रामसेवकाला दोन किंवा तीन गावांचा कारभार पहावा लागतो. ग्रामसेवकांसाठी हे अतिरिक्त काम आहेच, परंतु त्याहीपेक्षा ग्रामसेवकांअभावी ग्रामस्थांच्या कामांचा खोळंबा अधिक आहे. सद्या जिल्ह्यात २० टक्के गावांत ग्रामसेवक नाहीत. त्यामुळे उर्वरित पदे तातडीने भरावीत, अशी मागणी गावांतून होत आहे. २०१८ नंतर ग्रामसेवक भरती झालेली नाही.

कंत्राटी ग्रामसेवकांच्या अनामतीचे काय?

ग्रामसेवकाची नियुक्ती झाल्यानंतर त्याला १० हजार रुपये अनामत रक्कम पंचायत समितीकडे भरावी लागते. पुढे संबंधित तालुक्यातच तीन वर्षे सेवा केल्यानंतर ग्रामससेवकाला कायमस्वरूपी नियुक्ती मिळते. त्यावेळी त्याची अनामत रक्कत परत करावी लागते. परंतु अनेक ठिकाणी या अनामत रकमा ग्रामसेवकांना वर्षानुवर्षे दिल्या जात नाहीत. अशी किती रक्कम जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे जमा आहे, याची आकडेवारी संबंधित विभागाकडे नाही. ती पंचायत समिती स्तरावर असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे म्हणणे आहे.

  • एकूण ग्रामपंचायती – १३१८
  • नियुक्त ग्रामसेवक – ८५६
  • रिक्त ग्रामसेवक – ९६
  • नियुक्त ग्राम विकास अधिकारी – २१६
  • रिक्त ग्रामविकास अधिकारी – ३७

2 thoughts on “Gramsevak Bharti 2022”

Leave a Comment