HDFC Bank Recruitment 2021 – देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणजे एचडीएफसी. HDFC बँकेने देशभरात शाखांचे जाळे विस्तारण्यासाठी एक मेगा प्लान तयार केला आहे. यानुसार ग्रामीण भागातील दोन लाख गावांपर्यंत बँक पोहोचणार असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यानुसार, सुमारे २ हजार ५०० नोकऱ्या एचडीएफसी बँक देणार असल्याचे सांगितले जात आहे.
HDFC बँकेने ग्रामीण भागात विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यादृष्टीने येत्या दोन वर्षांत देशातील दोन लाख गावांमध्ये बँकेच्या शाखांचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी मिळू शकेल. बँकेच्या माहितीनुसार, आगामी ६ महिन्यांत सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून, यामुळे बँकेच्या सेवा पोहोचवणे शक्य होईल.
HDFC Bank आताच्या घडीला देशातील ५५० जिल्ह्यांमध्ये सेवा पुरवते. एचडीएफसी बँक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त बँकिंग सेवा पुरवते. देशाच्या अन्य भागात त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी या बँकेने २ हजार ५०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारानंतर देशातील एक तृतीयांश ग्रामीण भागांमध्ये बँकेचे अस्तित्त्व निर्माण होईल, असे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. या योजनेनंतर देशातील बहुतांश भागाला बँकिंग क्षेत्राशी जोडणे सोपे होईल आणि जास्तीत जास्त देशवासी बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतील. क्रेडिट आणि कर्जाच्या बाबतीत, देशातील ग्रामीण आणि निम-शहरी भाग अजूनही मोठ्या प्रमाणावर सेवांपासून दूर आहेत. तथापि, बँकिंग व्यवस्थेच्या शाश्वत विकासात ही क्षेत्रे मोठी भूमिका बजावू शकतात, असा विश्वास HDFC Bank कमर्शियल अँड रूरल बँकिंग ग्रुप हेड राहुल शुक्ला यांनी व्यक्त केला आहे.
How can aply this job????
Yes
हो
Yes
I Am intereste me job
I am interested me job
I am interested me job
How can applied
Yes
Yes
I am intrest by job
Yes
How can I apply…link
YES I HAVE INRSTED THE JOB
I am interest job
Yes I am Interested.
I’m iterated this job for apply to the post I’m agree