महाराष्ट्रात १२०७ रिक्त पदांसाठी भरती सुरू!

महाराष्ट्रात १२०७ रिक्त पदांसाठी भरती सुरू!

Healthcare Govt Jobs 2024 Maharashtra :

 एचएलएल लाईफ केअर लिमिटेड यांच्या अंतर्गत देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. यातील १२०७ पदे ही महाराष्ट्रात आहेत. या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी १७ जुलै २०२४ ही शेवटची तारीख आहे. या नोकरी मधून कर्मचाऱ्याला दर महिना साधारण ५०,०००/- होऊन अधिक वेतन मिळू शकते.

एच एल एल लाईफ केअर लिमिटेड हे जगभरात उच्च दर्जाचे हेल्थकेअर प्रॉडक्ट्स आणि त्या संदर्भातील इतर सेवा पुरवतात. ही संस्था मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फॅमिली वेल्फेअर यांच्या अंतर्गत काम करते. या संस्थेअंतर्गत भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू आहे. त्यातील महाराष्ट्र राज्यात एकूण १२०७ रिक्त पदे असून त्यासाठीची भरती प्रक्रिया २ जुलै २०२४ पासून सुरू झालेली आहे.

महाराष्ट्रातील १२०७ रिक्त पदे कोणती आहेत आणि त्या त्या पदांसाठीच्या शैक्षणिक अपेक्षा काय आहेत याची माहिती घेऊ:

सीनियर डायलेसिस टेक्निशियन:

  • मेडिकल डायलेसिस टेक्नॉलॉजी विषयात पदवी किंवा डिप्लोमा आणि ८ वर्षांचा कामाचा अनुभव
  • मेडिकल डायलॉग टेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण आणि ६ वर्षांचा कामाचा अनुभव

डायलेसिस टेक्निशियन:

  • संबंधित विषयातील सर्टिफिकेट कोर्स आणि ७ वर्षांचा कामाचा अनुभव
  • मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयात पदवी आणि ५ वर्षांचा कामाचा अनुभव
  • मेडिकल डायलेसिस टेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण आणि २ वर्षांचा कामाचा अनुभव

ज्युनिअर डायलेसिस टेक्निशियन:

  • संबंधित विषयातील सर्टिफिकेट कोर्स आणि ४ वर्षांचा कामाचा अनुभव
  • मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयात पदवी आणि २ वर्षांचा कामाचा अनुभव
  • मेडिकल डायलेसिस टेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण आणि १ वर्षाचा कामाचा अनुभव

असिस्टंट डायलेसिस टेक्निशियन:

  • संबंधित विषयातील सर्टिफिकेट कोर्स
  • मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी विष
  • १ वर्षाचा कामाचा अनुभव

अकाउंटंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टीगेटर:

  • CA किंवा CMA-Inter
  • M.Com
  • MBA
  • २ वर्षांचा कामाचा अनुभव

ॲडमिन असिस्टंट:

  • कोणत्याही शाखेतील पदवी पर्यंतचे शिक्षण
  • ५ वर्षांचा HR/ Admin म्हणून अनुभव

वर नमूद केलेल्या कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी १७ जुलै २०२४ ही शेवटची तारीख आहे

वय वर्ष ३७ आणि त्याहून कमी वय असलेली कोणतीही व्यक्ती या रिक्त पदांसाठी अर्ज भरू शकते. ST/SC आणि OBC वर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये शासकीय नियमांनुसार सूट मिळेल. इच्छुक उमेदवार www.lifecarehll.com/careers येथून या भरती संबंधित अधिक माहिती मिळवू शकतात

Leave a Comment

9163