IAF Agniveer List of Required Documents

IAF Agniveer List of Required Documents – Important documents required for the IAF Bharti 2022 are given below. If you are applying for this IAF Bharti then be prepared with following documents. 

Recruitment:अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय हवाई दलात भरती प्रक्रिया २४ जून २०२२ (IAF रिक्तता २०२२) पासून सुरू होत आहे. यासाठी नोंदणी केवळ ऑनलाइन माध्यमातूनच करता येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय हवाई दल भरतीचा प्लॅटफॉर्म careerindianforce.cdac.in द्वारे अर्ज करू शकतात.

अग्निवीर वायू (IAF Agniveer Recruitment) साठी अर्ज करणारे उमेदवार गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी विज्ञान विषय न घेतलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. त्यांना बारावीमध्ये इंग्रजीमध्ये ५० टक्के आणि एकूण ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

अग्निवीर वायु उमेदवारासाठी आवश्यक कागदपत्रे :

1) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
२) बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र/३ वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा गुणपत्रिका/दोन वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका
३) अलीकडे क्लिक केलेला पासपोर्ट आकाराचा (१०केबी ते ५० केबी पर्यंत) रंगीत फोटो
४) स्कॅन केलेला डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
५) सहीचा स्कॅन केलेला फोटो
६) पालकांच्या सहीचा स्कॅन केलेला फोटो
७) डिप्लोमा किंवा दहावी/बारावीमध्ये इंग्रजी विषयाचे गुण दर्शविणारी मार्कशीट
८) आधार कार्ड
९) जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालयमधील उमेदवारांना आधार क्रमांक भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे.
१०) वैध आयडी आणि मोबाईल नंबर

Leave a Comment