ICAI CA Result 2024 CA फाउंडेशनची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींची प्रतीक्षा संपली; icai.nic.in पाहता येईल निकाल !
ICAI CA Result 2024 :
आईसीएआई सीए जून 2024 च्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपणार आहे. त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ICAI CA या जूनमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे. इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India) आज म्हणजेच 29 जुलै 2024 रोजी ICAI CA जून परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करू शकते. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती ते सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतील. ज्यांना या परीक्षेचा निकाल पाहायचा आहे त्यांनी खालीलप्रकारे पाहावा.
निकाल कसा पाहायचा?
- परीक्षार्थी खाली दिलेल्या स्टेप्सनुसार त्यांचे निकाल तपासून डाउनलोड करू शकतील.
- सर्व उमेदवारांना सर्वप्रथम icai.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- यानंतर, उमेदवारांनी होमपेजवर असणाऱ्या ICAI CA फाउंडेशन परीक्षा 2024 चा निकाल तपासण्यासाठी लिंक दिसेल. त्यानंतर त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी तेथे त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करावे.
- क्रेडेन्शियल्स सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर निकाल दिसेल.
- शेवटी निकालाची ती प्रिंट परीक्षार्थी डाउनलोड करू शकतात.
अलीकडेच केंद्रीय परिषद सदस्य (CCM) धीरज खंडेलवाल यांनी त्यांच्या अधिकृत X खात्यावर एक पोस्ट केली होती. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की जून 2024/जुलै 2024 महिन्यात झालेल्या सीए फाउंडेशन परीक्षा आणि माहिती प्रणाली ऑडिटचे निकाल सोमवार, 29 जुलै 2024 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. ICAI CA फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40 टक्के गुण आणि एकूण 50 टक्के गुण मिळवावे लागतील.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents