ICAR Bharti 2021 – nbsslup.in – भारतीय कृषी संशोधन परिषदेत नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर योजना (NBSS & LUP) या संस्थेने विविध पदांसाठी अर्ज जारी केले आहेत. तसेच या अंतर्गत सल्लागार, संशोधन सहयोगी, एसआरएफ आणि प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी एकूण ६६ जागा रिक्त आहेत. यासाठी २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत मेलद्वारे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- सल्लागार- ०३ पदे
- रिसर्च असोसिएट- ०२
- वरिष्ठ संशोधन फेलो – १७ पदे
- प्रकल्प सहाय्यक – ४४ पदे
ICAR Bharti 2021 Salary Details :
सल्लागार – ७०००० हजार रुपये दरमहा.
रिसर्च असोसिएट – पदव्युत्तर पदवीधारकासाठी ४९००० हजार रुपये आणि पीएचडी पदवीधारकासाठी दरमहा ५४००० हजार रुपये.
सीनियर रिसर्च फेलो – पहिल्या वर्षासाठी ३१००० हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षापासून ३५००० हजार रुपये.
प्रकल्प सहाय्यक – २५००० हजार रुपये दरमहा
वयोमर्यादा
रिसर्च असोसिएट या पदाकरिता पुरुषांसाठी जास्तीत जास्त त्यांचे वय ४० वर्षे आणि महिलांसाठी ४५ वर्षे.
सीनियर रिसर्च फेलो या पदाकरिता पुरुषांसाठी कमाल वय ३५ वर्षे आणि महिलांसाठी ४० वर्षे.
अर्ज पाठवणे
उमेदवार भरतीसाठीचा अर्जचा फॉर्म नॅशनल ब्यूरो ऑफ सॉईल सर्व्हे आणि लँड यूज प्लॅनिंग https://www.nbsslup.in/ या अधिकृत वेबसाईटवरून प्राप्त करु शकतात. तसेच उमेदवारांनी nbssgis@gmail.com. अर्ज पाठवायचा आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांनी पाठवलेल्या अर्जाच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तसेच निवड केलेल्या उमेदवारांची ऑनलाइन पद्धतीने मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. दरम्यान अद्याप त्याची तारीख ठरलेली नाही. अर्ज करताना विहित नमुन्यातच रेझ्युमे पाठवा. यासह इतर कोणतीही कागदपत्रे पाठवू नका. निवडीनंतर इतर कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहे.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents