ICT मुंबई अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; विविध पदांकरीता भरती सुरु, लवकर करा अर्ज !
ICT Mumbai Bharti 2024 : इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी – मुंबई अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण ११३ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार https://www.ictmumbai.edu.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. तसेच अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ एप्रिल २०२४ असणार आहे.
रिक्त पदे आणि पदसंख्या –
- प्रोफेसर – ७
- असोसिएट प्रोफेसर – १३
- असिस्टंट प्रोफेसर – ४१
- प्रशासकीय पदे – १२
- ग्रंथालयातील पदे – ३
- संस्था स्तरावरील पदे – १
- संस्था प्रयोगशाळांमधील – २५
- संस्था कार्यशाळेतील पदे – ११ आदी ११३ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – ५५ वर्षे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून, प्रयोगशाळा अटेंडन्ट पदासाठी अर्ज करणारा उमेदवार विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असावा; तर प्रयोगशाळा असिस्टंट पदासाठीचा उमेदवार विज्ञान शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
लिंक – https://shorturl.at/dqsN7
अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.