इंडिया पोस्टच्या ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल जाहीर !

इंडिया पोस्टच्या ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल जाहीर !

India Post GDS Result 2024 : महाराष्ट्र आणि गोवा राज्यात राहणाऱ्या, आपल्या मातृभाषेतून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभाग घेता येईल. नोकरीचे ठिकाण प्रत्येक जिल्ह्यातील पदानुसार त्या त्या ठिकाणी असेल. मराठी किंवा कोंकणी माध्यमातून तुमचे इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण झाले असेल तरच तुम्हाला या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. विशेष करून इयत्ता दहावी च्या गुणपत्रिकेतले गणित आणि इंग्रजी या दोन विषयांमधले गुण ही प्राधान्याने लक्षात घेतले जातील.

इंडिया पोस्ट लवकरच ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहे. शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM)/डाक सेवक या पदांसाठी 12 जुलै ते 05 ऑगस्ट 2024 या कालावधीत अधिकृत वेबसाइटवर indiapost.gov.in पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत ते निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. हा निकाल कसा पाहायचा ते आज जाणून घेऊया.

 

इंडिया पोस्टच्या ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल कसा पाहायचा?

  • उमेदवार इंडिया पोस्टच्या ग्रामीण डाक सेवकचा निकाल https://indiapostgdsonline.gov.in/ वरून पाहू शकता
  • सुरुवातीला अधिकृतIndia Post GDS Online वेबसाइटवर जा.
  • तुम्ही अर्ज केलेला प्रदेश म्हणजेच रिजन निवडा.
  • आता, तिथे GDS Result च्या PDF ची लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट स्क्रीनवर दिसेल.
  • त्या यादीत तुमचा निकाल पाहण्यासाठी CTRL+F दाबा आणि तुमचा रोल नंबर टाइप करा.
  • त्यानंतर तुमचा निकाल दिसेल.

भारतीय डाक विभागात महाराष्ट्रात मराठी आणि कोंकणी अशा दोन भाषांसाठी अनेक रिक्त पदांसाठीची भरती निघाली होती. महाराष्ट्रात ३ हजार ८३ रिक्त जागांसाठी तर गोव्यात (GDS Goa post result) एकूण ८७ रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. यात सहभागी होण्यासाठी ५ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख होती.

महाराष्ट्रात मराठी भाषेतील एकूण ३ हजार ८३ पदांसाठी भरती सुरू आहे. ज्यातील यातील १ हजार ३१८ पदे ही खुल्या वर्गासाठी आहेत आणि इतर १ हजार ७६५ पदे ही विविध वर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. गोव्यात कोंकणी आणि मराठी एकत्रित यासाठी एकूण ८७ रिक्त पदे आहेत. ज्यातील ४७ जागा खुल्या वर्गासाठी आहेत तर ४० जागा या इतर वर्गांसाठी राखीव आहेत. या रिक्त पदांवर रुजू होणाऱ्या उमेदवारांना दर महिना १०,०००/- ते २९,०००/- इतके वेतन दिले जाईल.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात राहणाऱ्या, आपल्या मातृभाषेतून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभाग घेता येईल. नोकरीचे ठिकाण प्रत्येक जिल्ह्यातील पदानुसार त्या त्या ठिकाणी असेल. मराठी किंवा कोंकणी माध्यमातून तुमचे इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण झाले असेल तरच तुम्हाला या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल. विशेष करून इयत्ता दहावी च्या गुणपत्रिकेतले गणित आणि इंग्रजी या दोन विषयांमधले गुण ही प्राधान्याने लक्षात घेतले जातील. त्यानुसारच पुढील फेरीसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

Leave a Comment