Indian Army भारतीय सैन्यात भरती प्रक्रियेला सुरुवात !
Indian Army Recruitment 2024 :
भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून यात जज ॲडवोकेट जनरल एन्ट्री स्कीम मधून भारतीय सैन्यात विविध पदांवर रुजू होता येणार. ही भरती पुरुष आणि महिला या दोघांसाठी आहे. भारतीय सैन्यात रुजू झाल्यावर त्या त्या पदांनुसार दर महिना ५६,०००/- ते २,००,०००/- हून अधिक वेतन मिळेल.
जेएजी म्हणजेच जज एडवोकेट जनरल एन्ट्री स्कीम, या योजनेच्या माध्यमातून २०२५ सालासाठी भारतीय सैन्यात विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या एन्ट्री स्कीम मधून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सैन्यातील शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी म्हणून केली जाईल.
या एन्ट्री स्कीम मधून महिला आणि पुरुष हे दोघेही अर्ज करू शकतात. कायद्याचा अभ्यास केलेल्या उमेदवारांना भारतीय लष्करासोबत काम करायचे असल्यास जे ए जी एन्ट्री स्कीम ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १५ जुलै २०२४ पासून सुरू होईल. १३ ऑगस्ट २०२४ ही अर्ज भरण्यासाठी ची शेवटची तारीख असेल.
जेएजी एन्ट्री स्कीम साठी पात्रतेचे निकष
- कायद्याचे पदवीधर असणे आवश्यक.
- विशेषत: एलएलबी पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य
- उमेदवारांनी किमान 55% गुणांसह तीन वर्षांचा किंवा पाच वर्षांचा LLB अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक
CLAT PG २०२४ उत्तीर्ण होणे आवश्यक - अर्जदाराचे वय २१ वर्षे ते २७ वर्षे असणे आवश्यक
- या एन्ट्री स्कीम मध्ये कोणतेही आरक्षण लागू होणार नाही.
- बार कौन्सिल ऑफ इंडिया/ राज्याच्या बार कौन्सिलमध्ये नोंदणी असणे आवश्यक
- अर्ज केलेल्या उमेदवारांमधून पुढे निवडक उमेदवारांची निवड केली जाईल आणि त्यांना OTA म्हणजेच ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी येथे
- कामाशी संबंधित ट्रेनिंग दिले जाईल. या ट्रेनिंग नंतर अधिकारी म्हणून नेमणूक केली जाईल.