Indian Bank इंडियन बँकेत नोकरीची संधी! ,आजच करा अर्ज

इंडियन बँकेत नोकरीची संधी! ,आजच करा अर्ज

Indian Bank Apprentice Recruitment 2024 :

इंडियन बँकेने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती १५०० रिक्त जागांसाठी होणार आहे, तर इच्छुक व पात्र उमेदवार इंडियन बँकेच्या (Indian Bank ) अधिकृत वेबसाइटद्वारे indianbank.in ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जप्रक्रिया १० जुलै २०२४ पासून सुरू झाली असून ३१ जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, उमेदवारांची निवड कशी होणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

Education Qualification शैक्षणिक पात्रता : ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी ३१/३/२०२० नंतर पदवी पूर्ण केलेली असावी आणि त्यांच्याकडे उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र असावे.

Age Limit वयोमर्यादा

उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावी. तसेच एससी / एसटी / ओबीसी / पीडब्ल्यूबीडी इत्यादी श्रेणींसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

Application Fee अर्ज फी

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. तर एससी / एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. तसेच उमेदवाराने अर्ज फी ऑनलाइन भरावी.

How to Apply अर्ज कसा कराल ? :

  • अर्ज करण्यासाठी सगळ्यात प्रथम अधिकृत indianbank.in.वेबसाइटवर जा.
  • येथे तुम्हाला लॉगिन विभागात नोंदणी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
    अर्ज भरा.
  • आता तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
  • नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • अशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.

कशी होईल उमेदवारांची निवड ?

जे उमेदवार शिकाऊ पदांसाठी अर्ज करणार आहेत, त्यांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षेद्वारे केली जाईल आणि त्यानंतर प्रत्येक उमेदवाराची स्थानिक भाषा चाचणी घेतली जाईल. परीक्षा प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये (बँकेने ठरवल्याप्रमाणे) घेतली जाईल, जी इंग्रजीमध्ये असेल. चाचण्यांमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातील. तसेच परीक्षेसाठी कॉल लेटर उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा बँकेच्या वेबसाइटद्वारे किंवा ( https://apprenticeshipindia.org/) ( https://nsdcindia.org/apprenticeship) किंवा (http://bfsissc.com) द्वारे जारी केले जातील.

Leave a Comment