गुड न्यूज ! IT क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; Infosys देतेय ५५ हजार नोकऱ्या, पाहा, डिटेल्स
Infosys Recruitment – In the time of the Corona Crisis, IT and IT companies are seen thriving. IT companies that are a vital component of the country’s economy and strive to strengthen the country’s economy are recruiting for a wide range of positions. While the country is slowly recovering from the second wave of Corona, a number of private sector companies, including the public sector, appear to have started the recruitment process. Infosys, now a leading IT company, will also provide 55,000 jobs. Nilanjan Roy, Chief Financial Officer, Infosys, a leading IT company, said that Infosys is focusing on promoting talent and skills in the country. The company is also looking to increase investment to make it even better. As part of this, the company will recruit 55,000 or more under the Global Hiring Program. Get all details related to Infosys Recruitment, Infosys Bharti 2022, Infosys Latest Job Opening 2022 at below:
Infosys Recruitment
IT क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिस कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी नीलांजन रॉय यांनी सांगितले की, देशातील प्रतिभा, कौशल्य यांना प्रोत्साहन देण्यावर इन्फोसिस भर देत आहे. तसेच याला आणखी उत्तम करण्यासाठी कंपनी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत कंपनी ५५ हजार किंवा यापेक्षा अधिक भरती करणार आहे.
कोरोना संकट काळात माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रातील कंपन्या यशस्वी घोडदौड करताना पाहायला मिळत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आयटी कंपन्या आपल्याकडील अनेकविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यानंतर देश हळूहळू सावरत असताना सरकारी क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी नोकर भरती प्रक्रिया सुरू केल्याचे दिसत आहे. यातच आता आघाडीची IT कंपनी असलेल्या Infosys नेही ५५ हजार नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे.
Infosys Latest Job Opening 2022
Infosys कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसंबर २०२० मध्ये इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ३१२ होती. ती वाढून डिसेंबर २०२१ मध्ये २ लाख ९२ हजार ०६७ इतकी झाली आहे. यापैकी महिला कर्मचाऱ्यांची संख्या ३९.६ टक्के असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे, TCS, Infosys आणि Wipro यांसारख्या दिग्गज आयटी कंपन्यांनी आपले तिमाहीचे परिणाम जाहीर केले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत या कंपन्यांना प्रचंड चांगला नफा झाल्याचे सांगितले जात आहे. Infosys चा नफा ५ हजार १९७ कोटींवरून ५ हजार ८०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान, TCS ने याच कालावधीत ९ हजार ७६९ कोटी रुपये, तर Wipro ने २ हजार ९७० कोटी रुपयांचा नफा कमावला. कर्मचारी संख्येबाबत बोलायचे झाले तर, TCS मध्ये आताच्या घडीला ५ लाख ५६ हजार ९८६ कर्मचारी कार्यरत असून, यामध्ये महिलांची संख्या २ लाखांवर आहे. तसेच Wipro मध्ये २ लाख ३१ हजार ६७१ कर्मचारी कार्यरत आहेत.
???? अर्ज करा
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents