IT Company Recruitment 2022

IT कंपन्यांमध्ये तब्बल 1.80 ते दोन लाखाहून अधिक नोकऱ्या; वाचा संपूर्ण माहिती

IT Company Recruitment 2022 – There is good news for young people looking for jobs in multinational companies. Jobs are likely to fall in India soon. Leading multinational companies from around the world will now provide around 1.80 to 2 lakh jobs in India. Large recruitment will be done in India by the firms of these companies Amex, Bank of America, and Morgan Stanley have decided to increase the number of employees in India. Amex, Bank of America, Wells Fargo, Citi, Barclays, Morgan Stanley, HSBC, Standard Chartered, Goldman Sachs, Amazon, Target, Walmart, Shell, GSK, Abbott, Pfizer, and AstraZeneca.

Jobs in IT company

बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच भारतात नोकऱ्यांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जगभरातल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारतात जवळपास 1.80 ते दोन लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहेत. अमेक्स, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले यासारख्या अनेक कंपन्यांनी भारतात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. लसीकरणानंतर ही परिस्थिती आता बदलली आहे. बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद करुन आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपन्यांमध्ये नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नव्हती. आता मात्र या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतात फर्म असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्या अर्थात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आता भारतात 1.80 लाख ते दोन लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे.

Mega Recruitment Drive

अॅमेक्स, बँक ऑफ अमेरिका, वेल्स फर्गो, सिटी, बारक्लेज, मॉर्गन स्टॅनले, एचएसबीसी, स्टॅन्डर्ड चार्टर्ड, गोल्डमन सॅक, अमेझॉन, टार्गेट, वॉलमार्ट, शेल, जीएसके, अॅबॉट, फायझर, अॅस्ट्राझेनेका या कंपन्यांच्या फर्मकडून भारतात मोठी भरती करण्यात येणार आहे.

पोस्ट कोरोना काळात जग अधिक डिजिटल होताना दिसतंय. त्यामुळे टेक्नॉलॉजी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या Global Capability Centres (GCCs) कडून यासाठी हालचाली सुरू आहेत. भविष्यात आर्टिफिशिअर इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज असणार आहे.


IT कंपन्यांमध्ये मेगा भरती, तब्बल 60,000 अधिक नोकऱ्या; वाचा संपूर्ण माहिती

IT Company Recruitment 2022 – Good news for those who want to work in the IT sector as well as candidates who are currently working in the IT sector. The world-renowned IT company, which has a number of local offices in India, will soon be offering over 60,000 jobs this year. Yes, we are talking about Capgemini. Capgemini India plans to hire 60,000 new employees, said Ashwin Yardi, CEO of Capgemini India.

Demand for this specialty has grown significantly as a result of recent corporate scandals. Capgemini’s growth in India is faster than the group’s growth in 2021. Because India will play a big role in managing the operations of this company. It will also focus on developing leaders in India who can then lead teams globally. The demand outlook remained strong for the rest of the year and the job drive gained momentum, it said.

IT क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या तसंच आता सध्या IT क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येतेय. जगभरात नामांकित आणि भारतातही अनेक ठिकाणीव ऑफिसेस असणारी मोठी IT कंपनी लवकरच या वर्षात तब्बल 60,000 नोकऱ्या देणार आहे. हो आम्ही कॅपजेमिनी या कंपनीबद्दल  बोलत आहोत. कॅपजेमिनी 60,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे अशी माहिती कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्दी यांनी सांगितलं आहे.

डिजिटल-नेतृत्वाखालील उपायांची मागणी वाढली आहे. कॅपजेमिनीची भारतामध्ये 2021 मध्ये समूहासाठी नोंदवलेल्या वाढीपेक्षा वेगाने वाढ झाली आहे. कारण या कंपनीच्या ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यात भारत मोठी भूमिका बजावेल. हे भारतातील विकसनशील नेत्यांकडे देखील लक्ष देईल जे नंतर जागतिक स्तरावर संघांचे नेतृत्व करू शकतील. उर्वरित वर्षासाठी मागणीचा दृष्टीकोन मजबूत राहिला आणि नोकरीच्या मोहिमेला चालना मिळाली., असे त्यात म्हटले आहे.

Jobs in IT company

क्वांटम, 5G आणि मेटाव्हर्स सारख्या अनेक नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे आणि पुढे जाण्यासाठी मोठ्या वाढीच्या ड्रायव्हर्सची अपेक्षा असल्याने कॅपजेमिनी जागतिककस्टमरसाठी या तंत्रज्ञानाभोवती उपाय तयार करण्यासाठी लॅब देखील स्थापन करत आहे. आमचे जागतिक स्तरावर सुमारे 3,55,000 कर्मचारी आहोत आणि त्यापैकी निम्मे भारतात आहेत आणि आम्हाला हेडकाउंटमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे,”त्यामुळे आम्ही या आर्थिक वर्षात इतकी मोठी पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे” असं कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्दी यांनी सांगितलं आहे. 5G आणि क्वांटम सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून नवीन नियुक्ती ही नवीन नियुक्ती आणि लॅटरल टॅलेंट यांचे मिश्रण असेल. कॅपजेमिनी ने एरिक्सन सोबतच्या भागीदारीसह गेल्या वर्षी भारतात 5G लॅब लाँच केली आहे. त्याचप्रमाणे, कॅपजेमिनीकडे क्लाउड आणि एआयसाठी एक अकॅडमी आहे जिथे आम्ही विशिष्ट क्षमता आणि सायबरसुरक्षा तयार करत आहे. “आम्ही या सर्वांमध्ये ट्रेंड पाहतो. म्हणूनच ही भरती या क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे असंही ते म्हणाले.

अलीकडेच या महिन्यात, कॅपजेमिनीने जाहीर केले आहे की एव्हरेस्ट ग्रुपच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सर्व्हिसेस PEAK Matrix® असेसमेंट 2022 मध्ये कंपनीला ‘लीडर’ आणि ‘स्टार परफॉर्मर’ असे दोन्ही अवॉर्ड मिळाले आहेत.. कॅपजेमिनीची ही सलग दुसरी वेळ आहे.

 


IT कंपन्यांमध्ये मेगा भरती 1 लाखांहून अधिक नोकऱ्या 

IT Company Recruitment 2022 -TCS, Wipro and Infosys, the major Comapnies in the IT sector, recently announced their third quarter results. All three companies have made huge profits. Last year (2021), these companies employed a record 1.7 lakh employees. The same hiring drive will continue in the 2022 financial year, the IT giants have announced. In 2020, the three IT companies together hired only 31,000 employees.

आयटी (IT) क्षेत्रातील मेजर प्लेयर्स असलेल्या टीसीएस (TCS), विप्रो (Wipro) आणि इन्फोसिसनं (Infosys) अलीकडेच आपापल्या तिसर्‍या तिमाहीचे रिझल्टस जाहीर केले. या तिन्ही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आहे. गेल्यावर्षी (2021) या कंपन्यांनी विक्रमी 1.7 लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या होत्या. हीच नियुक्ती मोहीम (hiring drive) 2022 या फायनान्शियल इयरमध्येही सुरू राहणार असल्याचं या आयटी दिग्गजांनी जाहीर केलं आहे. 2020 मध्ये तिन्ही आयटी कंपन्यांनी मिळून फक्त 31 हजार कर्मचारी नियुक्त केले होते.

महामारीच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणावर डिजिटल मोडमध्ये (digital mode) प्रवेश केला आहे. याशिवाय गेल्या वर्षभरात या कंपन्यांनी कर्मचारी भरती वाढवली आहे. येत्या आर्थिक वर्षात या तिन्ही आयटी कंपन्यांचे हायरिंग प्लॅन काय आहेत, याची माहिती आपण घेऊया… 2022मध्ये इन्फोसिस देणार इतक्या नोकऱ्या भारतातील दुसरी सर्वांत मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं (Infosys) बुधवारी (12 जानेवारी) आपली येत्या आर्थिक वर्षातील कर्मचारी भरती योजना जाहीर केली आहे.

येत्या आर्थिक वर्षात, ग्लोबल ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रामचा (global graduate hiring programme) भाग म्हणून 55 हजार पेक्षा जास्त फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा विचार कंपनी करत आहे. डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीचे रिझल्ट्स जाहीर करताना ही माहिती देण्यात आली. ‘आम्ही टॅलेंट अ‍ॅक्विझिशन (talent acquisition) आणि डेव्हलपमेंटमधील (development) गुंतवणुकीला प्राधान्य देत आहोत. यासाठी ग्लोबल ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रामअंतर्गत 2022मध्ये 55 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या देण्याचा आमचा विचार आहे,’ अशी माहिती इन्फोसिसचे चीफ फायनान्शियल ऑफिसर निलांजन रॉय (Nilanjan Roy) यांनी दिली.

डिसेंबर 2021पर्यंत कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाख 79 हजार 617 वरून दोन लाख 92 हजार 67 वर गेली होती. ‘ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमची टॅलेंट स्ट्रॅटेजी चांगली असणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही कर्मचार्‍यांचं हित जोपासून त्यांची स्किल्स आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारेख (Salil Parekh) यांनी स्पष्ट केलं. 2022मध्येही सुरू राहणार टीसीएसची नोकरभरती इन्फोसिसप्रमाणं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनंसुद्धा (TCS) बुधवारी आपले तिमाहीचे रिझल्ट्स जाहीर केले आहेत.

2022मध्ये टीसीएस आपली कर्मचारीभरती मोहीम सुरुच ठेवणार आहे. मात्र, वर्षभरात कंपन्या किती नोकऱ्या देणार आहे याबाबतची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. ‘आमची कर्मचारी भरती आहे त्याचं स्पीडनं सुरू राहील. पण, येत्या तिमाहीत किती नियुक्ती केली जाईल याची विशिष्ट आकडेवारी आम्ही सध्या निश्चित केलेली नाही’, असं कंपनीचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर (chief human resources officer) मिलिंद लक्कड (Milind Lakkad) यांनी मीडियाला सांगितलं.

देशातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर एक्सपोर्टर असेलल्या टीसीएसनं नुकताच दोन लाख कर्मचारी संख्येचा टप्पा गाठला आहे. वर्कफोर्सचा (workforce) विचार केल्यास टीसीएस ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. यापूर्वी, टीसीएसनं मार्चपर्यंत 34 हजार फ्रेशर्सची (freshers) नियुक्ती करणार असल्याचं सांगितलं होतं. पण, कंपनीनं हे टारगेट आधीच पूर्ण केलं आहे.

असं असूनही कंपनीनं जानेवारी ते मार्च या तिमाहीत आपली नियुक्ती प्रक्रिया (hiring procedure) सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2022मध्ये विप्रो देणार इतक्या नोकऱ्या विप्रो 2023 या आर्थिक वर्षामध्ये सुमारे 30 हजार फ्रेशर्सला नोकऱ्या देण्याच्या विचारात आहे. आयटी क्षेत्रातील सध्याची स्थिती पाहता भविष्यात आयटीला जास्त मागणी असणार आहे. मागणी वाढलेली असताना पुरवठ्यामध्ये अडथळे येऊ नये यासाठी पुरेशी कर्मचारी संख्या असणं आवश्यक आहे.

त्यामुळं गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून 70 टक्क्यांहून अधिक फ्रेशर्सना ऑनबोर्ड (onboard) घेण्याचा विचार कंपनी करत आहे. 2022मध्ये विप्रोनं सुमारे 17 हजार 500 जणांना नोकरी दिली आहे. उर्वरित 2022 आणि 23 मध्ये आणखी 30 हजार फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा विचार कंपनी करत आहे, अशी माहिती विप्रोचे प्रेसिडेंट (President) आणि सीएचआरओ सौरभ गोविल (Saurabh Govil) यांनी दिली आहे. येत्या आर्थिक वर्षात देशातील तीन मोठ्या आयटी कंपन्या साधारण लाखभर नोकऱ्या देण्याचा विचार करत आहेत. आयटी आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या ग्रज्युएट्ससाठी ही मोठी संधी मानली जात आहे.


‘ही’ मोठी IT कंपनी करणार तब्बल 65,000 कर्मचाऱ्यांची भरती; वाचा संपूर्ण माहिती

IT Company Recruitment 2022 – Capgemini is one of the leading IT firms in India. So now the company has decided to hire more employees. IT companies were booming even during the Corona epidemic. That is why now some IT companies have started offering a large number of job opportunities (Career in IT companies in India). Companies like TCS, Infosys have announced recruitment of thousands of employees (TCS Mega recruitment for freshers). Well-known and big IT like Capgemini (Capgemini Mega openings for freshers) can’t be less behind. That is why the company is now planning to recruit 65,000 employees (Capgemini for 65,000 IT experts) in the coming year, sources said.

कोरोना महामारीच्या संकटाच्या काळातही IT कंपन्या जोमात सुरु होत्या. म्हणूनच आता काही IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉब्सच्या संधी देण्यास सुरुवात केली आहे. TCS, Infosys सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. यात Capgemini सारखी नामांकित आणि मोठी IT कमी मागे असेल असं होऊच शकत नाही. म्हणूनच आता कंपनीनं येत्या वर्षात तब्बल 65,000 कर्मचाऱ्यांची भरती  करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Capgemini कंपनीमध्ये भारतासह 50 पेक्षा जास्त देशांमध्ये एकूण प्रमुख संख्या सुमारे 2 लाख 90,000 आहे. भारतात, या कंपनीमध्ये सुमारे 1 लाख 25,000 कर्मचारी काम करत आहेत. मोठ्या तज्ञांना करिअरची वाढ प्रदान करत असल्याने ही भारतातील आघाडीवर चालणारी IT फर्म आहे. त्यामुळे आता कंपनीनं अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलीकडेच, HCL Technologies ने नमूद केले आहे की ते सुमारे 60% नवीन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल. आणि चालू आर्थिक वर्षांमध्ये सुमारे 22,000 नवीन नोकर भरती करण्याची योजना आहे. दुसरीकडे, TCS 15,000 ते 18,000 महिला कर्मचार्‍यांना सामावून घेण्याची योजना आखत आहे. त्यात L&T नंही महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता Capgemini 65,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ही भरती कधी आणि कोणत्या निकषांवर केली जाईल याबाबत कंपनीकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. मात्र TCS, Infosys आणि Cognizant या कंपन्यांचं अनुसरण करून Capgemini कंपनीही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती करेल असंगी माहिती सूत्रांकडून मिळत आहे

Cognizant देणार तब्बल एक लाख फ्रेशर्सना नोकरी

Cognizant या मोठ्या IT कंपनीनं येत्या काही काळातील IT क्षेत्रांतील स्पर्धा आणि स्कोप बघता TCS आणि इन्फोसिसच्या पावलावर पाऊल ठेवत तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांची भरती (1 lac jobs for freshers in Cognizant) करणार असल्याची माहिती मिळतेय. ExamDaily या डिजिटल वेबसाईटनं यासंबंधीचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

???? अर्ज करा


देशातील प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये भरती; ६० हजार महिला उमेदवारांची होणार निवड

IT Company Recruitment 2021 – The country’s leading IT companies are currently running college campus placements. Through this campus placement, about 60,000 women candidates will be recruited in Wipro, Infosys, HCL, TCS by the end of this year. These companies are hiring women freshers candidates. Read More information about IT Company Recruitment 2021 at below

देशातील प्रमुख आयटी कंपन्या हल्ली कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट चालवत आहेत. या कॅम्पस प्लेसमेंटद्वारे, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल, टीसीएसमध्ये या वर्षाच्या अखेरीस सुमारे ६० हजार महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या कंपन्या महिला फ्रेशर्स उमेदवाराची नियुक्ती करत आहेत आणि यापुढेही करणार आहेत. यासाठी कंपन्यांकडून वेगळा प्लान तयार करण्यात आला आहे. सर्व नियुक्त्या एंट्री लेव्हलच्या असणार आहेत. उद्योग संस्था नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार भारतातील आयटी उद्योगामध्ये सध्या जेंडर कम्पालयन्स ३३ टक्के आहे.

महिलांना TCS मध्ये १८ हजार पगार

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये एन्ट्री लेवलसाठी ३८ ते ४५ टक्के महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या फ्रेशर्स महिला उमेदवारांना १५ हजार ते १८ हजारपर्यंत पगार दिला जाईल. सध्या कंपनीमध्ये १.८५ लाख महिला कर्मचारी आहेत.

HCL तर्फे २२ हजार नियुक्त्या

एचसीएल कंपनीने कॅम्पस प्लेसमेंटद्वारे या वर्षाच्या अखेरीस २२ हजार नवीन उमेदवारांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोएडामध्ये मुख्यालय असलेल्या या आयटी फर्मने आपल्या नियुक्त्यांमध्ये ६० टक्के महिला उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती एन्ट्री लेव्हलसाठी असणार आहे.

विप्रो आणि इन्फोसिसमध्ये २०३० पर्यंत ५० टक्के महिला उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहेत. इन्फोसिस आपल्या कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांच्या ४५ टक्के महिलांना एन्ट्री लेव्हलला काम करण्याची संधी देणार आहे. या कंपनीने ३५ हजार महाविद्यालयीन पदवीधरांना भरती आणि प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्त्यांमध्ये ५० टक्के महिला उमेदवारांसाठी भरती राखीव असेल. विप्रोला कॅम्पसमधून ३० हजार फ्रेशर्सची भरती करायची आहे. यापैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.


IT Company Recruitment 2021 – India’s biggest IT services company Tata Consultancy Services or TCS will be hiring over 40,000 freshers from campuses in India in the fiscal year 2021-22.

देशातील दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी टीसीएसने मोठी घोषणा केलीय. चालू आर्थिक वर्षात टीसीएस महाविद्यालयाच्या परिसरातून 40 हजारांहून अधिक फ्रेशर्स भरणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सध्या खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी मालक कंपनी आहे. कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांची संख्या 5 लाखांहून अधिक आहे. मागील वर्षीही कंपनीने कॅम्पसमध्ये 40 हजार फ्रेशर्स घेतले होते. कंपनीचे ग्लोबल ह्युमन रिसोर्सचे चीफ मिलिंद लकड म्हणाले की, यंदा हे काम आणखी चांगले होणार आहे.

नफ्यात प्रचंड उसळी

देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसने चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त नफा कमावला. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा नफा 28.5 टक्क्यांनी वाढून 9,008 कोटी रुपये झाला. यापूर्वी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 7,008 कोटी रुपयांचा नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्नही 18.5 टक्क्यांनी वाढून 45,411 कोटी रुपये झाले.

नोकरी देण्याची प्रक्रिया खूप लांब असते

लक्कड म्हणाले की, नोकरी देण्याची प्रक्रिया खूप लांब असते. असे नाही की कंपनीला प्रोजेक्ट मिळाल्यानंतर हायरिंगची प्रक्रिया सुरू होईल. जर एखाद्याची हायरिंग केल्यास त्याला किमान तीन महिने लागतात, त्यानंतरच तो प्रोजेक्टमध्ये काम करण्यास सुरुवात करतो. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम म्हणाले की, आपल्या देशात कौशल्याची कमतरता नाही, यासह त्यांनी खर्चाचा मुद्दाही नाकारला.


नोकरी शोधणाऱ्यांना यंदा भरपूर संधी उपलब्ध होणार ! 60 टक्के कंपन्या नोकरभरतीच्या तयारी

IT Company Recruitment 2021 – Good news for those who are unemployed or looking for a job alert when there is an atmosphere of COVID. This year, 60 per cent of companies will offer opportunities to young people for new jobs. This has become clear in a survey. In the first wave of corona, many jobs were lost in 2020, and salaries were cut. But once again this year, various companies are preparing for recruitment. 60 percent of companies are keen to hire young people.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सव्वा वर्षांत अनेकदा कठोर निर्बंध लादले गेले. त्याचा फटका उद्योग जगताला बसला. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना पगार कपात सहन करावी लागली. मात्र आता नोकरी शोधणाऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहेत. या वर्षात ६० टक्के कंपन्या भरती प्रक्रिया राबवणार आहेत. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल. व्हर्च्युअल माध्यमातून मुलाखती घेत अनेक कंपन्यांनी एप्रिल, मे पासूनच भरती प्रक्रिया सुरू केली. आता जुलैपासून भरती प्रक्रिया अधिक वेगानं राबवण्यात येणार आहे.

अनेक कंपन्या नव्या जागा भरणार 

मर्सर मेट्टलच्या रिपोर्टनुसार, कोरोनाकाळात आता अनेक कंपन्या नव्या जागा भरणार आहेत. आम्हाला प्रतिभाशाली युवकांची गरज असून आम्ही जागा भरणार आहोत, असं 60 टक्के कंपन्यांनी म्हटलं आहे.

व्हर्चुअल हायरिंग

येत्या काळात नियुक्तीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. कारण सर्व्हेत सहभागी सर्वांनी कोरोना महामारीच्या काळात डिजीटल माध्यमांचा अधिक वापर केल्याचं म्हटलं. त्यामुळे येत्या काळात नियुक्तीची प्रक्रिया ऑनलाईनच असेल असं कंपन्यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर 81 टक्के कंपन्यांनी व्हर्चुअल हायरिंग केल्याचं नमूद केलं आहे.

ऑफलाईन ते ऑनलाईन

बहुसंख्य कंपन्या कोरोनाकाळात ऑफलाईनवर ऑनलाईनमध्ये शिफ्ट झाल्या. त्याचा बराच फायदा झाल्याचं या कंपन्यांनी म्हटलं आहे. Mercer Mettlच्या सर्वेक्षणानुसार भविष्यात कंपन्या व्हर्च्युअल हायरिंगला प्राधान्य देतील. लॉकडाऊन काळात जवळपास ८१ टक्के कंपन्या कर्मचारी भरतीसाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कर्मचारी भरतीचा वेग स्थिर असेल, असं सर्वेक्षण अहवाल सांगतो.


IT Company Recruitment 2021– According to a survey in India, there will be increase in workforce by 2021 in Big Companies Like Wipro, TCS, Infosys and HCL. Despite the Corona epidemic, these companies are going to increase their workforce in 2021. Read More details at below:

कोरोनाच्या महामारीमुळे २०२० हे वर्ष नोकरदार वर्गासाठी अतिशय वाईट ठरलं असलं तरी २०२१ या वर्षात तरुणाईसाठी नोकऱ्यांची कमतरता भासणार नाही. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी रोजगारात घट आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असल्या तरी २०२१ या वर्षात बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचारी संख्येत वाढ करण्याची तयारी दाखवली आहे.

IT Company Recruitment 2021

भारतात एका सर्वेक्षणानुसार ५३ टक्के कंपन्यांनी २०२१ या वर्षात कर्मचारी संख्येत वाढ करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यातील ७४ टक्के कंपन्यांनी आपल्या कर्मचारी संख्येत तब्बल १४ टक्क्यांनी वाढ करणार असल्याचं सांगितलं आहे. कोरोनामुळे २०२० या वर्षात नव्या नोकरींच्या संख्येत १८ टक्क्यांची घट झाली होती. पण त्याचवेळी मेडिकल आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये उल्लेखनीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

आरोग्य क्षेत्रासोबतच इंटरनेटवर आधारित सेवा क्षेत्रांमध्ये जसं की ई-कॉमर्स आणि शिक्षण क्षेत्रात मागणी वाढली आहे. या क्षेत्रांमध्ये या वर्षात मोठी भरती केली जाऊ शकते.  मायकल पेज इंडियाच्या सर्वेक्षणानुसार २०२१ या वर्षात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ करण्याची तयारी दाखवली आहे. भारतातील ६० टक्के कंपन्यांनी पगार आणि बोनस देण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे, यातील ४३ टक्के कंपन्यांचा कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याचा विचार सुरू केला आहे .

भारतात अॅडव्हांस टेक्नोलॉजीच्या माध्यमातून सॉफ्टवेअर मॅनेजमेंट, गेमिंग आणि आयटी क्षेत्रात तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या क्षेत्रातही रोजगारात वाढ होणार आहे.

आरोग्य क्षेत्रात यंदाच्या वर्षात सर्वाधिक पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तर त्यापाठोपाठ दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमध्येही चांगली पगारवाढ अपेक्षित आहे. आयटी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या चार कंपन्यांमध्य नोकरभरती होणार आहे.

TCS, Infosys, HCL आणि Wipro कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबत या तिमाहीत ३६,४८७ कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. येत्या काळातही या कंपन्यांमध्ये मोठी भरती केली जाऊ शकते.  महत्वाची बाब म्हणजे, गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत या चारही कंपन्यांनी केवळ १०,८२० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या तुलनेत यंदाच्या तिमाहीत नोकरभरतीत तब्बल २४० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

आयटी क्षेत्रातील चारही बड्या कंपन्यांकडून रोजगार वाढीचे प्रमाण असेच वाढत राहिले तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात या क्षेत्रात तब्बल ९१ हजार नवी नोकरभरती होऊ शकते.

3 thoughts on “IT Company Recruitment 2022”

Leave a Comment