Kolhapur ZP मध्ये भरती; त्वरित करा अर्ज!

Kolhapur ZP मध्ये भरती; त्वरित करा अर्ज!

Kolhapur ZP Recruitment 2024 : कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेत चार रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती आयएफसी ब्लॉक अँकर आणि सीनियर सीआरपी या पदांसाठी सुरू आहे. बारावी उत्तीर्ण असलेल्या तसेच शेतीविषयक अभ्यासक्रमातून पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

कोल्हापूर जिल्हा परिषदेत विविध पदांसाठीच्या जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे भरतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यावरती सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाइन पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे.

Kolhapur ZP Bharti 2024

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेत ४ रिक्त पदे आहेत. या रिक्त जागा दोन पदांमध्ये विभागलेल्या आहेत. आयएफसी ब्लॉक अँकर या पदासाठी दोन रिक्त जागा तर सीनियर सीआरपी या पदासाठी दोन रिक्त जागा उपलब्ध आहेत.

 

आय एस सी ब्लॉक अँकर या पदी रुजू झाल्यानंतर उमेदवाराला दर महिना २२,५००/- वेतन देण्यात येईल. तर तर सीनियर सीआरपी या पदावर रुजू झाल्यानंतर उमेदवारास ७,५००/- इतके वेतन दर महिन्याला देता येईल.आयएफसी ब्लॉक अँकर या पदासाठी किंवा सीनियर सीआरपी या पदासाठी वय वर्ष ४३ हून कमी वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच या पदावर केली जाणारी नियुक्ती ही कंत्राटी तत्त्वावर असेल.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या सदर भरतीतील निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखात या दोन फेऱ्यांच्या माध्यमातून केली जाईल. अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची हमी देणारी प्रमाणपत्रे, तसेच त्यांच्या कामाचा अनुभव सांगणारी कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण पद्धतीने भरलेला अर्ज या भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद भरतीत सहभागी होऊ इच्छित असलेल्या उमेदवारांनी घ्यावी.

भरती संदर्भातील विविध घोषणा तपासण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या https://www.zpkolhapur.info/ अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.

Leave a Comment