KVK सोलापूर कृषी विज्ञान केंद्रात भरती; ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज!
KVK Recruitment 2024 : कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे भरती सुरू आहे. या भरतीतून टेक्नॉलॉजी एजंट या पदावर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. शेती विषयक अभ्यास केलेले किंवा शेती विषयातील पदवी घेतलेले उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. टेक्नॉलॉजी एजंट म्हणून रुजू झाल्यानंतर नियुक्ती झाल्यावर उमेदवारांना मिळणार इतके स्टायपेंड.
सोलापूरातील कृषी विज्ञान केंद्रात भरती सुरू आहे. ही भरती टेक्नॉलॉजी एजंट या पदासाठी सुरू आहे. या भरतीत इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने सहभाग घेऊ शकतात. कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे सुरू असलेल्या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक २१ ऑगस्ट २०२४ पूर्वी भरणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया-
कृषी विज्ञान केंद्र सोलापूरातील रिक्रुटमेंट बोर्डने टेक्नॉलॉजी एजंट या पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. या पदावर रुजू झाल्यानंतर त्या उमेदवारासाठी सोलापूर हे नोकरीचे ठिकाण असेल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी दिनांक २१ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख ठरवून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने जमा करणे अपेक्षित आहे. दिनांक २१ ऑगस्ट २०२४ नंतर सादर केलेले अर्ज या भरतीमध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत.
निवडप्रक्रिया कशी असणार?
वय वर्ष २१ ते ४५ या दरम्यान वय असलेले उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात. SC/ ST वर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत पाच वर्षांची अधिक सूट मिळेल. OBC वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत तीन वर्षांची अधिक सूट मिळेल. कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथील भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने ॲग्रीकल्चर सायन्सेस विषयात डिप्लोमा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. ॲग्रीकल्चर विषयातील पदवीधर उमेदवार या भरतीत प्राधान्य देण्यात येईल. सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या या टेक्नॉलॉजी एजंट या पदावर पात्र उमेदवारांची नियुक्ती केल्यानंतर तो उमेदवार त्या पदावर पुढील सहा महिन्यांसाठी रुजू होईल. टेक्नॉलॉजी एजंट या पदाची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने केली जाईल व हे कंत्राट सहा महिन्यांचे असेल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे-
इच्छुक उमेदवारांनी ॲग्रीकल्चर विषयातील पदवी उत्तीर्ण किंवा ॲग्रीकल्चर सायन्सेस विषयात डिप्लोमा पूर्ण केलेला असेल तर त्या संदर्भातील गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला कामाचा अनुभव असल्यास त्या संदर्भातील कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करण्यात देखील आवश्यक आहे. अर्ज करतेवेळी त्यात आवश्यकते सर्व माहिती योग्य भरलेली आहे याची पडताळणी करून मगच अर्ज जमा करावा. चुकीच्या पद्धतीने सादर केलेला अर्ज किंवा अपूर्ण असलेला अर्ज प्रक्रियेत ग्राह्य धरला जाणार नाही
सोलापूर कृषी विज्ञान केंद्रात टेक्नॉलॉजी एजंट म्हणून रुजू झाल्यानंतर उमेदवाराला दर महिना १०,०००/- स्टायपेंड मिळेल. या भरती संदर्भातील अधिक माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या https://www.mpkvkvkmohol.org/ या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.