‘लाडक्या बहिणीं’ना आता तीन गॅस सिलेंडर मोफत !
Ladki Bahin Yojna 2024 :
केंद्र शासनाकडून पंतप्रधान उज्ज्वला योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसजोडणी घेतलेले तसेच, सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅसजोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅसजोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना आणल्या जात आहेत. काही दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणण्यात आली. त्यानंतर आता प्रत्येक कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याच्या योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र असलेल्या महिला भगिनींना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्यासोबतच आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडरदेखील मोफत देण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाकडून पंतप्रधान उज्ज्वला योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसजोडणी घेतलेले तसेच, सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅसजोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅसजोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही.
या पार्श्वभूमीवर २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.